टीम इंडियाने नुकताच कसोटी सामन्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून द.आफ्रिकेसोबत बरोबरी केली आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरूद्ध टीम इंडियाने (Team India) सुर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली संघाला विजयी केलं. टी 20 सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) बादशाह म्हणून संबोधलं जातं. मात्र आता सुर्या आगामी अफगानिस्तानच्या टी 20 सामन्याविरोधातील मालिकेत खेळणार नसल्याची चिन्हं आहेत. अशातच आता सुर्याच्या पायाच्या घोटाला दुखापत झाली आहे. अधीच दुखापत असताना सुर्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालीये. सुर्या एका आजाराशी झुंज देत आहे. त्यासाठी त्यावर उपचार घेण्यासाठी परदेशी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे वर्ल्डकप आणि आयपीएलला मोठा धक्का बसणार आहे.
सुर्यकुमारला हर्नियाचं निदान झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सुर्या बंगळूरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. आजारावर उपचार करण्यासाठी सुर्या जर्मनीला जाणार आहे. त्याठिकाणी म्युनिक येथे जाणार आहे. सुर्यकुमारची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी वेळ लागणार असल्याची माहिती आता समोर येणार आहे. याबाबत अजूनही अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. यामुळे आता सुर्यकुमार यादव आयपीएलला दिसण्याची शक्यता कमी आहे.
Suryakumar Yadav is set to undergo Hernia Surgery and his recovery process to take time is 8 to 9 weeks.
– He is likely to miss first few games in IPL 2024 as well. (TOI) pic.twitter.com/AXTFjO8HpZ
— CricketMAN2 (@ImTanujSingh) January 8, 2024
हे ही वाचा
‘आमच्यावर बलात्कार होतोय’, ८ महिला पोलिसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
‘बच्चा है पर मन का सच्चा है’, अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं गाण्यातून मिश्किल प्रत्युत्तर
२२ जानेवारीला आयोध्या नाहीतर काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे घेणार दर्शन
टी 20 क्रिकेटमधील विश्वात सुर्या एक नंबर
सुर्यकुमार यादव हा टी 20 जगतातील एक नंबरचा फलंदाज आहे. मात्रा आता सुर्यावर लवकरच परदेशामध्ये आपल्या आजाराच्या उपचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सुर्या आगामी काही सामन्यामध्ये काही मालिकांमध्ये खेळणार का? असा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे. आता टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सुर्या टी 20 क्रिकेटमधील हुकमी एक्का आहे. हाच हुकमी एक्काच जर नसेल तर टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ होऊ शकेल. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेसोबत झालेल्या दौऱ्यावर सुर्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा असून त्याने ती उत्तम पेलली.