24 C
Mumbai
Sunday, March 3, 2024
Homeराजकीय'बच्चा है पर मन का सच्चा है', अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं...

‘बच्चा है पर मन का सच्चा है’, अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं गाण्यातून मिश्किल प्रत्युत्तर

आगामी लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यामुळे आता विरोधीनेते सत्ताधारी पक्षावर तर सत्ताधारी विरोधी पक्षांवर टीका करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर (५ जानेवारी) ईडीचा तपास सुरू होता. रोहित पवार यांनी ईडीने मागितलेले सर्व कागदपत्रं दिले आहेत. मुंबईमध्ये देखील सहा कार्यालयावर ईडीने धाड मारली आहे. यावरून आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दुपारी पत्रकार परिषदेदरम्यान रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद सोडण्याचं आवाहन केलं. तर सुनील कांबळे प्रकरणी अजित पवार गप्प का आहेत? असा रोहित पवार यांनी सवाल केला.

काय आहे नेमकं प्रकरण?

रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीने धाड टाकली आहे. कंपनीमध्ये तपासणी सुरू असल्याचं रोहित म्हणाले होते. मुंबईतील काही कार्यालयावर तपास सुरू आहे. यावरून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘एकतर उपमुख्यमंत्री पद ठेवा नाहीतर गृहमंत्री पद ठेवा’, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यानंतर भाजप आमदार सुनील कांबळे यांंनी पोलिस अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा ‘अजित दादा स्टेजवर होते त्यावेळी का गप्प होता’?, असा सवाल रोहित पवार यांनी केला. यावर अजित पवार यांनी रोहित पवारांवर ‘बच्चा आहे तो’, असं म्हणत टीका केली आहे. यावर आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर मिश्किल टीप्पणी केली आहे.

हे ही वाचा

‘गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा’

डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटला राम राम

‘देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा’

काय म्हणाले अजित पवार?

भाजप नेते सुनील कांबळे (५ जानेवारी) पुण्यातील ससून रूग्णालयाच्या कर्यक्रमात गेले असताना त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावली. यावेळी अजित पवार त्याठिकाणी उभे होते. यावर अजित दादांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. रोहित पवार यांनी अजित पवार यांना दादा आता गप्प का? असा सवाल केला. यावर माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी ‘रोहित पवारच्या टीकेला उत्तर द्यावं इतका तो अजून मोठा नाही, तो अजून बच्चा आहे. माझे प्रवक्ते त्याला उत्तर देतील,’ असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘बच्चा है पर मन का सच्चा है’ गाण्यातून अजित पवारांना टार्गेट

यावर रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या ट्विटर हॅंडलवर ‘बच्चा है पर मन का सच्चा है’ हे गाणं शेअर केलं आहे. यामध्ये अजित पवारांनी रोहित पवार अजून बच्चा आहे अशी टीका केली त्या टीकेस प्रत्युत्तर म्हणून रोहित पवार यांनी हे गाणं शेअर करत अजित पवारांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीनं समाचार घेतला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी