32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्र'व्यसनमुक्तीसाठी सेवाभावींचा हात'

‘व्यसनमुक्तीसाठी सेवाभावींचा हात’

देशातील युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेली असल्याने देशात व्यसनमुक्ती केंद्र बनवली जात आहेत. भारतात सर्वाधिक युवा पिढी आहे. मात्र युवा पिढी ही व्यसनाधीनतेने आपल्या आयुष्याला शुन्य बनवत आहे. व्यसनाधीनतेवर सेवाभावी हेच व्यसनमुक्ती करण्याचं काम करत आहे. अशा ठिकाणी इच्छाशक्ती, प्रामाणिकणा, पारदर्शकता असण्याची गरज आहे. व्यसनमुक्तीसाठी आपण मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार असल्याचे व्यसनमुक्तीसाठी मोलाचे योगदान द्विजेन स्मार्त यांनी जायकवाडी येथे केलं आहे. दरम्यान, व्यसनमुक्ती केंद्राचा शुभारंभ हा द्विजेन स्मार्तच्या हस्ते करण्यात आला.

काय म्हणाले स्मार्त 

आपल्यावर झालेले संस्कार, व्यक्तिमत्व घडवतात मात्र आपल्याला व्यसनाशिवाय काहीच करता येत नाही असं जेव्हा वाटतं, तेव्हा  तो अधिकच व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, असं समजावं. आत्मविश्वास उरत नाही. अशा वेळी तुला जे करायचं आहे ते करू शकतो, असा विश्वास व्यसनमुक्ती केंद्रातील उपचारांनी दिला पाहिजे. ते मी करतो आणि इथेही ते झाले पाहिजे असे वाटते, यावर आता डॉ. लोंढेंनी वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा

ओबीसीच्या लढ्याचा जनक मीच; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

बीडमधील सभेत दिपक केसरकरांचा शिक्षिकेवर संताप म्हणाले; ‘जरा श्रद्धा सबुरी ठेवा’

लोढे म्हणाले की,  व्यसनमुक्ती केंद्रात वाढ होणं गरजेचं आहे. कारण भारतात अनेक तरूण व्यसनाधीनतेकडे वाटचाल करत आहे. यामुळे अधिक व्यसनमुक्ती केंद्र असावीत. इंटरनेट हे नवे व्यसन आहे. यावर मुलांहून अधिक पालकांनी लक्ष केंद्रीत करावे, असे लोंढे म्हणाले आहेत. डॉ. तेजस गयाळ यांनी मद्यपाश या आजाराची लक्षणे, उपाय, उपचार आणि अल्कोहोलिक ॲनॉनिमस संघटनेच्या कामाची माहिती दिली. इनामदार यांनी प्रास्ताविकेत आपला मद्यपाश आजार ते व्यसनमुक्तीकडील वाटचाल सांगितली. काही व्यसनमुक्ती केंद्रात शारीरिक, मानसिक छळ केला जातो. त्यामुळे मद्यपी, व्यसनी व्यक्तीला प्रेम, जिव्हाळा आणि प्रेरक उपायांनी व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे केंद्र सुरू केली जात आहेत, असेही ते म्हणाले.

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी बाळासाहेब शेवतेकर, कातपुरचे सरपंच धनंजय मोरे पाटील, पिंपळवाडीचे सरपंच दादासाहेब गलांडे, विरंगुळा संस्थेचे कार्यवाह अनिल देशमुख, आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, साहित्यिक व केंद्र प्रमुख रामकृष्ण बिडवई, प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब जाधव, महेंद्र नरके, लक्ष्मण शेलार उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी