26 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयओबीसीच्या लढ्याचा जनक मीच; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

ओबीसीच्या लढ्याचा जनक मीच; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी (OBC) समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. यावेळी या वादात मराठा समाजाने आमदारांचे बंगले देखील जाळले होते, यावर मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता या ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे. पुण्यात  प्रकाश आंबोडकरांची पत्रकार परिषद होती, यावेळी त्यांनी भुजबळांना बाहेर काढणारा मीच आहे. ओबीसी लढ्याचा जनक मीच असल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. यावरून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आहे. याबाबत अजूनही कोणाला कल्पना नव्हती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आता मला पुन्हा इतिहास सांगायची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच आहे. न्यायालयात पलटवार मीच केला. याबाबत त्यांनी माझे कधीच आभार मानले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या, मग कळेल की, ओबीसीच्या लढ्याचा जनक मी आहे. यावेळी त्यांनी राज्यात दंगली कधीही घडू शकतात, असं भाष्य केलं आहे.

हे ही वाचा

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

बीडमधील सभेत दिपक केसरकरांचा शिक्षिकेवर संताप म्हणाले; ‘जरा श्रद्धा सबुरी ठेवा’

देशात हजारो कोटींचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग रॅकेट; किसान आर्मी व वॉटर आर्मीची कारवाईची मागणी

राज्यात दंगली कधीही घडू शकतात

सध्याचं राज्यातील वातावरण पाहता अनेकदा राज्यात दंगली घडू शकतात, असे पाहायला मिळते. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सत्रावर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू असून यावर मुस्लिम संघटना आझाद मैदानावर सभा घेणार आहे. आम्ही त्यांच्यासोबत असल्याचं आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवा, हा मुस्लिमांचा विषय आहे म्हणून सोडून द्यायचं, असं भाजप सांगत आहे. सरळ प्रश्न आला तर सरळ उत्तर देईल. पण मला जसा प्रश्न येईल, तसं उत्तर मी देणार आहे. एकदा बोललो की बोललो विधान मी कधीच मागे घेणार नाही.  राज्यात सध्या दंगली कधीही घडू शकतात, असे वक्तव्य प्रकश आंबेडकरांनी केलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी