28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर शरद पवार गटाचे १० पानी उत्तर

राज्यात काही महिन्यांपासून राष्ट्रवादी पक्षांमध्ये दोन गट पडल्याने आमदार अपात्रतेवर (MLA Disqualification) काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी तारीख पे तारीख घेत होते, मात्र आता आजपासून येत्या पाच दिवसात विधानसभा अध्यक्ष सुनावणीसाठी असणार आहेत. न्यायलयाने अध्यक्षांना जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी (NCP) आमदार अपात्रतेच्या निकालासाठी वेळ दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसाठी डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, आता अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे. अधिक आमदार आमच्याकडे असल्याने खरा राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच असल्याचे वारंवार बोललं जातंय. (Sharad Pawar)

यावर नार्वेकरांनी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला आपापली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. यावर अजित पवारांनी पक्ष आमचाच असल्याचा दावा २६० पानी उत्तरात केला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रतोद अनिल पाटील हे आमच्या गटात आहेत, यामुळे खरी राष्ट्रवादी आमचीच असून अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा अजित पवार गटाचा दावा आहे.

हे ही वाचा

बीडमधील सभेत दिपक केसरकरांचा शिक्षिकेवर संताप म्हणाले; ‘जरा श्रद्धा सबुरी ठेवा’

देशात हजारो कोटींचे बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडींग रॅकेट; किसान आर्मी व वॉटर आर्मीची कारवाईची मागणी

‘धर्मवीर २’ सिनेमा हिंदीतही यायला हवा’

शरद पवार गटाचं आमदार आपात्रतेवर १० पानी उत्तर

विधिमंडळातून शरद पवार गटातील आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीला शरद पवार गटाच्या आमदारांनी १० पानी उत्तर दिलं आहे. यावर आता अध्यक्ष नार्वेकर काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचे असणार आहे.  अशातच आता राष्ट्रवादी पक्षाची आमदार अपात्रता सुनावणीची अंतिम तारीख ही ३१ जानेवारी असणार आहे. तर शिवसेना पक्षाची सुनावणी ही ३१ डिसेंबर असणार आहे. अशातच अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटासह हातमिळवणी केली असून उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले आहेत. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आमचीच असून पक्षाच्या घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाच्या या भूमिकेवर शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. यावर पुढं काय घडणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी