32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे रमले शेतीत

एकनाथ शिंदे रमले शेतीत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आगामी निवडणुकांमुळे अनेकदा चर्चेत पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहीलं तर मुख्यमंत्री अनेक ठिकाणी दौरो करत असल्याचं पाहायला मिळत आहे. ते काही दिवसांआधी मुंबईच्या रस्त्यावरील घाण साफ करताना दिसत होते. तर मुंबईतील जुहूच्या बीचवर ट्रॅक्टरने साफसफाई करताना दिसत असतात. त्यांचे अनेकदा शेती करण्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होते. ते गावी यात्रेला गेले असल्याची माहिती समोर आली. माझे पाय जन्मभूमीकडे येतात आणि अपोआप शेताकडे वळतात. यावेळी त्यांचं शेतीप्रेम पुन्हा एकदा दिसून आलं आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील त्यांनी शेती करत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

एकनाथ शिंदे रमले शेतीत

मुख्यमंत्री कोणत्या पिकांची लागवड करतात?

काही महिन्यांआधी एखनाथ शिंदे हे शेतीकाम करताना दिसत होते. सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी यात्रेनिमित्त गेले असताना ते आपल्या शेतामध्ये दिसले आहेत. औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा , सफरचंद, अव्हॅकॅडो, अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची त्यांनी लागवड केली आहे. शेतीचं आणि एकनाथ शिंदे यांचं एक वेगळंच नातं असल्याचं पाहायला मिळतं. मातीचा गंध हा शेतीकडे आपल्याला खेचून आणतो. अशी भावना एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलतक असताना व्यक्त केली आहे.


हे ही वाचा

भगवं वादळ नाशिकहून पुण्याकडे रवाना

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, ‘गुजरात’प्रेमाची उडविली खिल्ली

हातात केळ दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी “एकच वादा रोहित दादा”

माणूस कितीही मोठा झाला तरीही त्यांना आपल्या गावाबद्दल प्रेम असते. शेतीत रमण्याचा एक वेगळाच आनंद असतो. शेती, गावाकडची माणसं यांच्या आयुष्याला एक वेगळं महत्त्व असते. कितीही एखादा माणूस मोठा झाला. तरीही त्याला आपल्या गावाकडची आणि माणसांची ओढ असते, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे रमले शेतीत

 

सातारा जिल्ह्यात मिशन सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी उत्पादन वाढणाऱ्या पिकांची लागवड करण्यास सांगितली म्हणजेच तेच पिक घ्यावे. दहा हजार हेक्टर प्रशासनाने बांबूचे उद्दीष्ट ठेवले आहे. बांबूसोबतच रेशीम आणि सुपारीची लावड करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी