32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रसंविधानप्रेमी वकीलांचे ईव्हीएम विरोधात आंदोलन

संविधानप्रेमी वकीलांचे ईव्हीएम विरोधात आंदोलन

नाशिक : गुरूवारपासून मतपत्रिकेच्या माध्यमातुन सर्व निवडणुका घेण्यात याव्यात, हा निर्णय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासुन घ्यावा आदी मागण्यासाठी संविधान प्रेमी वकील गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. ॲड.डांगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डांगे यांनी देशामधील सर्व नागरिकांमध्ये EVM मशीनच्या माध्यमातुन होणाऱ्या निवडणुकांबाबत शंका निर्माण झाली आहे. निवडणूक काळात निवडणूक यंत्रामध्ये अनेक ठिकाणी बिघाड होऊन निवड प्रक्रिया कामात गोंधळ निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील EVM मशीनसोबत VVPAT बाधा होऊ नये या करिता निवडणुक आयोगास देखील मार्गदर्शक तत्वे वेळोवेळी दिली आहेत आणि व्हिपॅडच्या सूचना दिल्या आहेत.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकाचे निकाला नंतर शंकाचे निरसन करणेसाठीची जी प्रक्रिया सांगितली आहे तशी व्हिव्हिपॅड प्रमाणे मोजणी होत नाही. तसेच EVM मशीन खराब आढळणे, काही इतरत्र आढळणे, आजपर्यंत किती EVM मशीन मागविल्या,सध्या उपलब्ध किती आहेत याची माहिती जनतेला नाही. त्यामुळें निवडणुक प्रक्रिया पारदर्शक होणेसाठी EVM मशीनच्या माध्यमातुन होणारी निवडणुक प्रक्रिया बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातुन मतदान प्रक्रिया राबवावी. अनेक देशामध्ये नागरिक EVM मशीनच्या माध्यमातुन होणाऱ्या निवडणुका तेथील नागरिकांच्या मागणीनुसार बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊन मतपत्रिकेच्या माध्यमातुन निवडणुका सुरू केल्या आहे.

हे ही वाचा

IPS अधिकाऱ्याने केले एका ग्राम चळवळीचे कौतुक !

हातात केळ दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी “एकच वादा रोहित दादा”

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, ‘गुजरात’प्रेमाची उडविली खिल्ली

प्रगत देशांनी सुध्दा EVM मशीन बंद केली आहे. नुकत्याच बांग्लादेशात देखील EVM मशीनच्या माध्यमातुन होणाऱ्या निवडणुका बंद करून मतपत्रिकेच्या माध्यमातुन निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊन तेथील नागरिकांच्या मागणीची पुर्तता करून तेथील नागरिकांना पारदर्शक निवडणुकी करिता विश्वास दिलेला आहे. त्यामुळे आमच्या मागणीची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अँड. बंडुनाना डांगे, निलेश सोनवने, प्रभाकर वायचळे, लीलाधर जाधव, सुदेश जाधव, कृष्णा शिलावट, तात्याराव जाधव, अमोल वानखडे, रवि कांबळे आदी वकील उपस्थीत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी