28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयहातात केळ दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी "एकच वादा रोहित दादा"

हातात केळ दाखवत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी “एकच वादा रोहित दादा”

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ईडीने (ED) प्रवेश केला आहे. ह्या वेळीस ईडीने (ED) शरद पवार गटाचे नेते आणि आमदार तसेच बारामती अॅग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांच्यावर काही दिवसांआधी ईडीने (ED) धाड टाकली होती. अशातच आज दिनांक २४ जानेवारी २०२४ ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आल आहे. ह्या वेळीस त्यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) आणि  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्यासोबत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई मधील कार्यालया बाहेर हातात केळ दाखवून “एकच वादा रोहित दादा” घोषणा दिल्या.

काही दिवसांपूर्वी पिंपळी येथे असलेल्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने धाड टाकली होती. मागीलवर्षी ईडीने बारामती अॅग्रो कंपनीला समन्स बजावले होते. ह्याची चौकशी करण्यासाठी ईडीने आमदार आणि बारामती अॅग्रो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार ह्यांना बोलविण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना रोहित पवार यांच्यावर  ईडीने कारवाई केली. काही दिवसांपासून रोहित पवार तरुणांचे प्रश्न सरकारकडे मांडत आहेत. “युवा संघर्ष यात्रेतून सरकारला रोजगाराबाबत प्रश्न उपस्थित केले. अशातच सुरू असलेल्या मराठा आरक्षणावर रोहित पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:-

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, ‘गुजरात’प्रेमाची उडविली खिल्ली

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी, १६ एप्रिलला होणार मतदान

शरद पवारांचा आशीर्वाद घेत ईडीला सामोरे 

राजकारण कोळून पिलेले नेते शरद पवार यांच्यावर देखील ईडीने चौकशीचे समन्स पाठवले होते. शरद पवारांनी ईडीला सामोर जाऊन आपली बाजू मांडली. मात्र आता त्यांचे नातू रोहित पवार यांच्यावर ही वेळ आली. नातवाणे आपल्या आजोबांचा आशीर्वाद घेऊन. ईडीने दिलेल्या नोटीशीचा आदर राखला आहे.

नीलेश राणे यांची मिश्किल टिप्पणी 

भाजप नेते नीलेश नारायण राणे यांनी रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीची खिल्ली उडवली आहे. रोहित पवार यांच्या मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावर एका कार्यकर्त्यांच्या हातात केळी दिसत आहे. यावरून नीलेश राणे यांनी संबंधीत विडियो सोशल मीडियावर प्रसारित करून मिश्किल टिप्पणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी