32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, 'गुजरात'प्रेमाची उडविली खिल्ली

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, ‘गुजरात’प्रेमाची उडविली खिल्ली

पंतप्रधान मोदींचं राजकारण घाणेरडं असून देश आणि गुजरातमध्ये भिंत बांधत आहेत. हे आम्हाला मान्य नाही.
महाराष्ट्रावर चक्रिवादळाचं संकट आलं तेव्हा मोदींनी पैसे दिले नाही. पण गुजरातला पळत गेले.
शिवरायांनी इंग्रजांची वखार सुरत लुटली होती. तुम्ही महाराष्ट्र ओरबाडून गुजरात समृध्द करत आहात. मिंदे गट मात्र दिल्लीसमोर शेपुट हलवत बसला आहे. आम्ही महाराष्ट्र ओरबाडू देणार नाही. देशासाठी मन की बात आणि गुजरातसाठी धन की बात हे चालणार नाही, या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानावर मंगळवारी २२ जानेवारी ठाकरे गटाच्या जंगी सभेत भाजपवर तोफ धडाडली. पंतप्रधान मोदी, अमीत शाह, फडणवीसांसह शिंदे गटावर त्यांची तोफ धडाडली.

‘आमचा राम मंदिराला विरोध नसून तो अस्मितेचा विषय आहे. पण आता शेंबड्या पोरांची शिवसेनेचं योगदान काय? विचारण्यापर्यंत मजल गेली’, या शब्दात त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता टिका केली. ‘बाबरी पडल्यावर सर्व आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी सर्वजण पळाले. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्विकारली याची आठवण त्यांनी भाजपला करुन दिली. काही बिनडोक लोक शंकराचार्यांचे योगदान काय असे प्रश्न विचारतात. सनातन धर्म तुम्ही मानतात. मग तुमची तळपायाची आग मस्तकात जात नाही का?’ असा सवाल विचारत भाजपात भ्रष्टाचार्‍यांना मान पण शंकराचार्याना नाही या शब्दात ठाकरे यांनी हल्ला चढवला.

‘सत्ता आमच्याकडे येऊ द्या, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालणार’

‘भाजपवाले देशात हिंदू आक्रोश मोर्चा काढतात. मोदी असताना आक्रोश करायची वेळ येणार असेल तर सत्ता सोडा आम्ही समर्थ आहोत’, असा इशारा त्यांनी दिला. राम मंदिर, ३७० कलमसाठी आम्ही भाजपला पाठिंबा दिला.कठिणकाळात शिवसेना मदतीला होती. ती शिवसेना तुम्ही संपवायला निघाला. हिमंत असेल तर मैदानात या. सरंक्षण कवच बाजूला ठेवा. इडी, सीबीआय या तुमच्या घरी धुणे भांडी करणार्‍या संस्था बाजूला करा मग शिवसेनेशी दोन हात करा असे खुले आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले. माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करतात. पण शिवसैनिक ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. भाजपकडे कार्यकर्ते देखील नाही. दंगल झाली की भाजपवाले शेपूट घालून पळतात. आमच्या नेत्यांवर ईडी सीबीआयच्या धाडी टाकतात. पण सत्ता आमच्याकडे येऊ द्या मग तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालणार असा दमच त्यांनी भरला. भाजप फेकड जनता पार्टी असून त्यांच्याकडे कर्तुत्व नाही. ते सर्व भेकड आहात. देशात असे भेकड झाले नाहित असा घणाघात त्यांनी केला.

हेही वाचा

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

महात्मा गांधी – पंडित नेहरूंना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केल्याशिवाय आपला एकही दिवस जात नाही, हे देशाचे दुर्दैव – भाग १ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

राजाराम जाधव कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्काराने सन्मानित

ठाकरे गटाचे भाजपवर आरोप

संकटात नव्हे तर मतांसाठी मोदी
महाराष्ट्रात येतात.

मणिपूर दोन जागा असल्याने जात नाही. महाराष्ट्रातील ४८ जागांवर डोळा.

भाजपकडून हिंदुमध्ये विष पेरण्याचे काम.

पाणबुडी प्रकल्प पळवला.

अयोध्येत शंकराचार्य नाही पण बाॅलीवूड हजर.

आता फिल्मफेअर गुजरातला पळवणार.

नार्वेकरला लबाड. ही गर्दी पाहून सांगा शिवसेना कुणाची

तुमचे आशीर्वादच शिवसेनेची घटना.

‘योगीजी तुम्ही सांभाळा’

राजकारणात हरवणं मान्य. पण विरोधक संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. शिवसेनेने पहिल्यादा देशाला हिंदुत्व देत निवडणुक लढवली. त्यावेळी जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी गांधीवादी विचारसरणी कवटाळर शिवसेनेविरुध्द उमेदवार दिला होता अशी टीका ठाकरेंनी केली. हिंदुत्व आम्ही दाखवले पण आता आम्हाला संपवायला निघाले आहेत. भयाण राजकारण सुरु असून एमपीत शिवराज सिग यांनी सत्ता आणली पण त्यानाच मामा बनवले. वापर करुन फेकले जात असून योगीजी तुम्ही सांभाळा असा खोचक टोला त्यांनी लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी