38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयमंत्रालयाबद्दल IPS देवेन भारतींनी चिंता व्यक्त केली, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय शोधून...

मंत्रालयाबद्दल IPS देवेन भारतींनी चिंता व्यक्त केली, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर उपाय शोधून दिला !

मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उडी मारुन आंदोलन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्याच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात घालत आहेत, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांना जाळीवरुन बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जाळीवर उतरावे लागते त्यामुळे जाळीवर वजन वाढून अपघात होऊ शकतो, यावर उपाययोजना करण्यासाठी विषेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्याला उभी जाळी बसविण्यासंदर्भात उपाययोजना सुचविली. त्यानुसार तातडीने हे काम हाती घेण्यात आले आहे.

काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील तरुणाने शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारुन आंदोलन केले होते. मागील आठ पंधरा दिवसांपूर्वी धरणग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी जाळीवर उड्या घेऊन आंदोलन केले होते. मंत्रालयाच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणे, मंत्रालयात विषारी औषध घेऊन आत्महत्या करणे असे प्रकार देखील मागे घडले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत उपाययोजना सुरु केल्या आहेत. काल अंबाजोगाई येथील तरुणाच्या आंदोलनानंतर आज लगेचच असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनाने उपाययोजना करत मंत्रालयाच्या गॅलरीला जाळी बसविण्याचे काम सुरु केले आहे. गॅलरीतून मंत्रालयाच्या जाळीवर कोणी उडी घेऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात व्हरांड्यात आता उभी जाळी बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

हे सुद्धा वाचा 
मुख्यमंत्र्यांनी दाखवली ३० देशांच्या नामवंतांना भारतीय संस्कृती
मंत्रालयात उड्या मारणाऱ्यांवर जाळीचे कोंदण !
सामान्य जनतेसाठी मंत्रालयात हुकूमशाही, दलालांना मात्र मुक्त प्रवेश !

ही जाळी अदृष्य असल्याने सहजासहजी दिसून येत नाही. तसेच ती मजबूत देखील आहे, त्यामुळे यापुढे मंत्रालयात बसविण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर उडी मारुन जीव धोक्यात घालून आंदोलन करण्याला अटकाव बसू शकतो. काल मंत्रालयात घडलेल्या प्रकारानंतर तातडीने शासनाने उपाययोजनांसदर्भात जीआर काढला होता. मत्रालयातील सुरक्षेच्यासाठी पोलीस आणि इतर विभागाला देखील सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विषेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी याबाबत चर्चा केल्यानंतर पीडब्ल्यूडी सुचविलेल्या उपाययोजना तातडीने अंमलात आणल्या जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी