31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला

राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला

महेश कातुरे,
टीम लय भारी

सोलापूर : शेकापचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज रात्री नऊ च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे वय ९५ वर्ष होते. सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Ganpatrav deshmukh were admitted to ashwini hospital, solapur)

गणपतराव देशमुख हे सांगोला विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक वेळा निवडून आले होते.अत्यंत साधी राहणीमान असलेल्या गणपतराव देशमुख यांनी ५४ वर्ष सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. राजकारणात अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप, एकमेकांवर शाब्दीक टीका होताना दिसते.मात्र गणपतराव देशमुख याला अपवाद होते.एक ही आरोप नसलेला निष्कलंक नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती.असे हे सज्जन व्यक्तिमत्त्व सामान्य जनतेला नेहमीच आवडायचे.गणपतराव देशमुख हे फावल्या वेळेत ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचून आपला वेळ घालवत असत.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान

राजकारणातील शेवटचा सज्जन माणूस हरपला
माजी आमदार गणपतराव देशमुख

बॉक्सर लव्हलिनाचा उपांत्य फेरीत प्रवेश, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक केले निश्चित

गेली अनेक वर्ष गणपतराव देशमुख यांनी शेकापचे नेतृत्व केले.ज्यावेळी महाराष्ट्रात पुलोदचे सरकार होते त्या सरकारमध्ये ते मंत्री देखील होते.

१९६२ सालच्या निवडणूकीत गणपतराव देशमुख यांनी पहिला विजय मिळवला होता.२०१२ साली त्यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली.१९७२ आणि १९९५ या दोन पंचवार्षिक निवडणूकाचा अपवाद वगळता सर्व निवडणुकामध्ये गणपतराव देशमुख यांनी विजय मिळवला होता.

एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला!

भाई गणपतराव देशमुख यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली

राज्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे एका व्रतस्थ लोकसेवकाचा प्रवास संपला, या शब्दात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ते म्हणाले की, भाई एक निस्पृह आणि चारित्र्यवान नेते होते. शेतकरी, कष्टकरी व गरिबांप्रती ते आयुष्यभर कटिबद्ध राहिले. तत्व, मूल्य आणि विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. त्यांची लोकप्रियता अफाट होती व त्यामुळेच मतदारांनी त्यांना प्रदीर्घ काळ आपले प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. जनतेच्या या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. प्रामुख्याने सांगोला परिसरासाठी त्यांनी मोठे काम केले. टेंभू-म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यासोबतच सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली.

मागील अनेक वर्ष विधिमंडळात त्यांचे काम जवळून बघण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा ते एक चालता-बोलता विश्वकोश होते. प्रचंड ज्ञान आणि अफाट कार्यक्षमता असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते असतानाही त्यांनी कधी बडेजाव केला नाही. आयुष्यभर त्यांची राहणी अगदी साधी राहिली. मागील विधानसभा निवडणुकीत ते ९३ वर्षांचे असताना सुद्धा पुन्हा त्यांनीच उभे रहावे, यासाठी तेथील जनता आग्रही होती. यातून अगदी नव्वदीतही त्यांची लोकप्रियता, जनसंपर्क आणि लोकांचा विश्वास कायम होता, हे दिसून येते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

गणपराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत ! : नाना पटोले

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्य संपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी 55 वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृत शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाही तर महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला शोक

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे. आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला.

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🙏

शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

Ganpatrao Deshmukh: गणपतरावांचं जाणं क्लेशदायक; पवारांनी ‘या’ शब्दांत वाहिली श्रद्धांजली

Ganpatrav
गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली

https://www.facebook.com/100040269725362/posts/551183122900674/?d=n

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुल्याधिष्ठित राजकारण करणारा
आदर्श लोकप्रतिनिधी हरपला

राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा
मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीचं
ध्येयनिष्ठ, सुसंस्कृत नेतृत्वं काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रानं सद्गगुणी सुपुत्र गमावला

“ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधीमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

गणपतराव देशमुख यांची कारकीर्द

गणपतराव देशमुख ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले.
गणपतराव देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट १९२६ रोजी झाला.
सांगोला मतदारसंघाचे ५४ वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केले.
एकाच मतदारसंघातुन जास्त वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम.
अत्यंत साधी राहणीमान.
आमदार असून एसटी ने कायम प्रवास.

गणपतराव देशमुख यांचे सांगोला येथील अत्यंदर्शन व अत्यंयात्रा

दि ३१/०७/२०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथून अंतयात्रा सुरवात

सकाळी १०.०० वाजता निवासस्थानी अत्यंदर्शन

दुपारी १२.०० वाजता सुतगिरणी येथे अत्यंदर्शन व अत्यंविधी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी