28 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रमला मारू नका... इस्रायलच्या 25 वर्षीय मुलीचं हमासकडून अपहरण; व्हिडिओ आला समोर

मला मारू नका… इस्रायलच्या 25 वर्षीय मुलीचं हमासकडून अपहरण; व्हिडिओ आला समोर

रशिया – युक्रेन यांच्या युद्धाला पूर्णविराम मिळेल तोवर शनिवार (7 ऑक्टोबर) या दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी गाजा पट्टयात इस्रायलवर पाच हजार रॉकटचा हल्ला केला आहे. यामुळे इस्रायलवर मोठं संकट उभे राहिले आहे. एवढंच नाही तर आता याचा परिणाम संपूर्ण जगावर आर्थिक किंवा मानसिकदृष्ट्या होऊ शकतो. अशातच सोशल मीडियावर या युद्धाचे काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यातील एका इस्रायलच्या मुलीचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. ती मुलगी ओरडत आहे. मात्र हमासचे दहशतवादी तिच्यावर अत्याचार करत असतानाचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं

हमासचे दहशतवादी पीडित मुलीला एका दुचाकीवरून घेऊन जात आहेत. तर पीडित मुलगी ‘मला मारू नका…’ असं जिवाच्या आकांताने ओरडत आहे. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार पीडित मुलगी ही गाजा पट्टयाच्या ठिकाणी आपला ज्यू सण साजरा करण्यासाठी आली होती. अशावेळी तिथं ट्रान्स मुझिक (ट्रान्स संगीताचा प्रकार) वाजत होते. अशावेळी ती यावेळी या ठिकाणी आपला प्रियकर अवि नॅथनसोबत ट्रान्सचा आनंद घेऊ लागली. मात्र याचवेळी हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट्स सोडले. यावेळी येथील असंख्य लोकं सैरावैरा धावू लागली होती. अशावेळी पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर या दोघांना पॉलिस्टीनी दहशतवाद्यांनी अपहरण केलं.

हेही वाचा

इस्रायल-पॅलेस्टिनींमध्ये युद्धचा भडका, हमासच्या हल्ल्याला इस्रायलकडून प्रत्युत्तर

अन्यथा टोलनाके जाळून टाकू, राज ठाकरेंचा इशारा

५ राज्यांच्या ७ नोव्हेंबरपासून निवडणुका, आचारसंहिता लागू

काय आहे नेमकं व्हिडिओत

व्हिडिओ पहिल्या कळतं की दहशतवादी पिडीतीचे अपहरण करत आहेत. अशावेळी पीडित मुलगी ओरडते मला मारू नका! नाही, नाही, नाही, असं ती म्हणत आहे. तर तिचा प्रियकर अवि नॅथनलाही दहशतवाद्यांनी ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. या क्रूर अपहरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी