26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रबळीराजा सुखावणार! राज्यभर जोरदार पावसाची शक्यता

बळीराजा सुखावणार! राज्यभर जोरदार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाने सांपूर्ण महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केले असून कोरड्या दुष्काळाचे सावट आता दुर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा निर्माण कझाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बातमीमुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा सुखावला असून पुन्हा एकदा शिवार फुलवण्यास सज्ज झाला आहे. शुक्रवार (15 सप्टेंबर) पासून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून शनिवारपासून पाऊस आणखी जोर पकडेल.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मारठवड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यात विजेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर खानदेशातील जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही जोरदायर पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा 

निलम गोऱ्हेंनी लिहीले आत्मचरित्र; चळवळीतील कार्यकर्त्या ते विधान परिषदेच्या उपसभापती!

एकाचा मृत्यू होवून सुद्धा वेश्या व्यवसाय, ड्रग्जचा व्यापार सुरुच

“ये मनोज जरांगे पाटील है कौन?” असं का म्हणाले मुख्यमंत्री?

भर पावसाळ्यात दडी मारून बसलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिति उद्भवली होती. राज्यातील काही धरणांमध्ये पाणी पातळी ही ऐन पावसाळ्यात अतिशय खालावली होती. आता महाराष्ट्रात ठिकठिकानी होणाऱ्या पावसाच्या कमबॅकमूळे राज्यातील नदी-नाले  पुन्हा भरण्याची शक्यता असून पाणीटंचाईच्या समस्येवर मात होईल का हे पहावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी