27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रडिजिटल पत्रकार परिषदेचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

डिजिटल पत्रकार परिषदेचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन २८ जानेवारी दिवशी होणार असून हे अधिवेशन २८ आणि २९ जानेवारी दिवशी कोल्हपूरमध्ये होणार आहे. सकाळी कोल्हापूर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छत्रपती शाहू महाराज आणि उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्र महागौरव आणि डिजिटल स्टार महागौरव २०२४ चे पुरस्कार वितरण केलं जाणार आहे. तर दुपारच्या सत्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार श्रीनिवास पाटील,  तर पालकमंत्री श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते होणार आहे.

माहिती संघटनेचे अध्यक्ष आणि संपादक ज्येष्ठ संपादक-पत्रकार राजा माने यानी मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना ही देशातील इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातील सर्वांत मोठी संघटना आहे. महाराष्ट्रासह देशभरातील ५ हजार ५०० डिजिटल चॅनेल, न्यूज वेब पोर्टल, प्रिंट मीडिया मधील संपादक, पत्रकार यांचा समावेश आहे. या मीडियाला राज्य शासनाकडून मान्यत मिळावी अशी मागणी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तसेच संपादक आणि पत्रकारांच्या माध्यमातून पाठपुरावा देखील केला जात आहे.

हे ही वाचा

उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींवर जहरी टीका, ‘गुजरात’प्रेमाची उडविली खिल्ली

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी, १६ एप्रिलला होणार मतदान

अभिनेता गिरीश कुलकर्णी घेणार अजितदादांची मुलाखत

२९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कणेरी मठ येथील भव्य सभागृहात अधिवेशनाचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी दुपारी ४ वाजल्याच्या सुमारास अजित पवार यांची मुलाखत होणार आहे. मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कुलकर्णी घेणार आहेत. तसेच राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तिंचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.

यावेळी अधिवेशनास कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी तसेच इतर मान्यावर आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी