29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रAir Pollution News : फटाक्यांमुळे होतेय मुंबई-पुण्यातील प्रदूषणात वाढ

Air Pollution News : फटाक्यांमुळे होतेय मुंबई-पुण्यातील प्रदूषणात वाढ

दिवाळी हा सण फटाक्यांशिवाय अपूर्ण आहे. पण याच फटाक्यांमुळे आता मुंबईची अवस्था पण दिल्लीसारखी होते का ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिवाळीत दिव्यांच्या प्रकाशासह नागरिकांकडून फटाके (Fire Crackers) देखील मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी फटाक्यांच्या उद्योगामध्ये कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर नागरिकांनी कोटी रुपयांचे फटाके फोडल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दिवाळी हा सण फटाक्यांशिवाय अपूर्ण आहे. पण याच फटाक्यांमुळे आता मुंबईची अवस्था पण दिल्लीसारखी होते का ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. कारण या दिवाळीत फोडल्या गेलेल्या फटाक्यांमुळे सर्वाधिक प्रदूषणाची (Air Pollution) नोंद करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे राज्यातील सर्वाधिक प्रदूषण झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘सफर’ या संस्थेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सार्वधिक फटाके फोडले गेले आहे. मागच्या वर्षी ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने लोकांना हवे तसे फटाके फोडता आले नाही परंतु यंदाच्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधीच पावसाने विश्रांती घेतल्याने लोकांनी फटाके फोडण्याचा मनमुराद आनंद लुटला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक फटाके फोडले गेले.

फटाके फोडल्याने हवेतील प्रदूषणात तर वाढ झालीच आहे. पण याचमुळे आता श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका देखील वाढला आहे. लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवसापर्यंत हवेत मुंबई, पुणे आणि नवी मुंबईच्या हवेत प्रदूषणाचा प्रभाव पाहण्यास मिळाला नाही. पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लोकांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे हवा प्रदूषित झाली आहे.

हे सुद्धा वाचा

Uber taxi : उबेर टॅक्सी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे विमान चुकले; कोर्टाने कंपनीला ठोठावला दंड

Ambadas Danve : अंबादास दानवे उद्या नाशिक, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार

IPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे कारण…

कोरोनामुळे गेले दोन वर्ष लोकांना सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता संपूर्ण देश निर्बंधमुक्त झाल्याने लोकं आनंदात सण साजरे करताना पाहायला मिळत आहेत. पुण्यासारख्या शहरात देखील हवेमधील प्रदूषणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात सर्दी-खोकला, तसेच डोळ्यांच्या साथीच्या रुग्णात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आता हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कमीत कमी फटाके फोडावे, अशी मागणी तसेच विनंती पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, हवेतील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम हा रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांवर अधिक होऊ शकतो. हवेतील प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता पातळी खालावली तर याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. इतकेच नाही तर हवेतील प्रदूषणात वाढ झाल्यास घराच्या बाहेर पडणे देखील घटक ठरू शकते. परिणामी, हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई अथवा पुण्याची दिल्ली होऊ नये, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी