33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रInternational 'Dog' Day : इंटरनॅशनल 'डॉग' डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

दर वर्षी 26 ऑगस्टला इंटरनॅशनल 'डॉग' डे साजरा केला जातो. 26 ऑगस्ट 2004 पासून अमेर‍िकेमध्ये अंतरराष्ट्रीय डॉग डे सुरू करण्यात आला. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे.

दर वर्षी 26 ऑगस्टला इंटरनॅशनल ‘डॉग’ डे साजरा केला जातो. 26 ऑगस्ट 2004 पासून अमेर‍िकेमध्ये अंतरराष्ट्रीय डॉग डे सुरू करण्यात आला. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. बॉलीवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये कुत्रा हा एक इमानदार प्राणी दाखवण्यात आला आहे. जगभरात अनेक माणसं कुत्रा प्रेमी असतात. अनेक देशांमध्ये घराघरात कुत्रा असतोच.‍ त्याचे अनेक प्रकार आहे. रेस्क्यू सेंटर मधील कुत्रे दत्तक घेण्यासाठी कुत्रा प्रेमींना या दिवशी प्रेरीत केले जाते. कुत्रा हा किती महत्त्वाचा प्राणी आहे ते या द‍िवशी सांगितले जाते. दर वर्षी या दिवशी कुत्रा या प्राण्यावर होणाऱ्या अत्याचारावर लक्ष केंद्रीत केले जाते.

अंतरराष्ट्रीय डॉग दिवस हा पेट लाईफस्टाईल एक्सपर्ट आणि कोलीन पेज नावाच्या पशु बचाव ॲव्होकेट आणि डॉग ट्रेनर आणि लेखक यांनी सुरु केला आहे. कुत्रा हा माणसाचा खरा मित्र आहे. तो घराची राखण करतो. तो मालकाला नेहमीच साथ देतो. त्याच्या संकटात मदत करतो. तो प्रामाण‍िक असतो. त्याच्या प्रेमामध्ये कोणताही स्वार्थ नसतो. त्यामुळे त्याचा सन्मान केला पाहिजे. संपूर्ण जगात कुत्र्यांच्या सुमारे 350 जाती आहेत.

जगात लहान कुत्र्यांच्या जाती खूप लोकप्रिय आहेत. लहान कुत्र्यांच्या जातीची सर्वांत प्रसिद्ध मालकीण राणी ‘व्हिक्टोरिया’ आहेत. पोमेरेनियन, पायरेनियन, मेंढपाळ, फिनिश स्टिट्ज, पोलिश लोलँड, शीपडॉग लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर्स, फ्रेंच बुलडॉग हे सर्वात लोकप्रिया कुत्रे आहेत. त्याचप्रमाणे सेस्की टेरियर, अमेरिकन फॉक्सहाउंड, बर्गमास्को शीपडॉग, इंग्रजी फॉक्सहाउंड, हॅरियर, चिनू, नॉर्वेजियन लुंडेहंड, स्लोघी या जातीचे कुत्रे देखील खूपच लोकप्रिय आहेत.

हे सुद्धा वाचा

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

Operation Lotus : महाराष्ट्रानंतर आता दिल्लीचे ‘केजरीवाल सरकार’ भाजपच्या रडारवर

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

सर्वांत महाग कुत्रे :
डोगो अर्जेंट‍िनो, कॅनेड‍ियन एस्कि‍मो, अझवाख, तिबेटी मास्टिफ, चाऊ चाऊ, लव्हचेन हे सर्वांत महाग कुत्रे आहेत. तर सर्वांत जास्त महाग कुत्रा सायबेरियातून उगम पावलेला ‘सामोएड’ हा कुत्रा आहे. तसेच जगभरात 15 जातींचे कुत्रे हे अतिशय हुशार समजले जातात. त्यामध्ये गोल्डन रिट्रीव्हर, डोबरमॅन पिन्शर, शेटलँड शीपडॉग, ऑस्ट्रेलियन बेल्जियन टर्वूरेन आदीं जातींचा समावेश होतो. तर लियोनबर्गर, कावपू, स्प्रिंगडोर, सायबेरियन हस्की, बर्नीज माउंटन, जुने इंग्रजी बुलडॉग, ब्लडहाउंड, लॅब्राडुडल हे कुत्रे दिसायला सर्वांत सुंदर आहेत. तर लॅब्राडोर रिट्रीव्हर हा कुत्रा सर्वात लोकप्रिय आहे.

तर दहा कुत्र्यांच्या जाती या जंगली प्राण्यांवर हल्ला करु शकतात. त्यामध्ये रॉटवेइलर, निओपॉलिटन, तिबेटी मास्ट‍िफ, बोअरबोएल, ऱ्होडेशियन रिजबॅक आणि ब्लडहाउुंडस, फ‍िला ब्रासिलेरो, डोगो अर्जेटीनो आणि कांगल्स. तर माल्टीज जातीचा कुत्रा सर्वांत जास्त आयुष्य जगतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी