24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रकोकणकर्जतमध्ये गणपती विसर्जनात चौघेजण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला 

कर्जतमध्ये गणपती विसर्जनात चौघेजण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला 

अनंत चतुर्दशीला गणरायाला भक्तिभावाने निरोप देत असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कर्जतच्या भिवपुरीजवळ चांदळी गणेश घाटावर उल्हास नदीवर गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले चौघे चौघेजण बुडाले. यात एकाचा मृतदेह हाती आला असून एक सुखरूप आहे तर दोघे वाहून गेले आहेत.वाहून गेलेल्या दोघांचा शोध स्थानिक आदिवासी, पोलिस आणि अन्य यंत्रणाच्या माध्यमातून घेतला जात आहे. घटनेत मृत झालेल्यासह वाहून गेलेले दोघे असे तिघे जवळच्याच उकरूळ गावात भाड्याने राहत होते.

या घटनेत एस. जगदीश शाहू (१५) याचा मृत्यू झाला आहे. एस. जगदीश शाहू, त्याचे जगदीश शाहू, केतन यादव आणि अन्य एक शाहू कुटुंबाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश घाटावर गेले होते. विसर्जन दरम्यान पाऊस जोरदार होता. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. एस. जगदीश शाहू वाहत असताना त्याला वाचवण्यासाठी जगदीश, केतन आणि अन्य एक प्रयत्न करत होते. पण यातील एक जण सुदैवाने वाचला. पण दोघे वाहून गेले तर एस शाहू याचा मृतदेह मिळाला.

हे सुद्धा वाचा 
भेसळखोरांवर कारवाई होणारच -धर्मरावबाबा आत्राम
संदिपान भुमरे यांचा कामाइतकाच लोकसंग्रह भलताच भारी
Video : दिशा पटानीला मुलांनी नाकीनऊ आणले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी