33 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणEknath Shinde : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाडयांना टोलमाफी, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Eknath Shinde : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाडयांना टोलमाफी, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

गणेशोत्सव अवघ्या काही द‍िवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. दोन वर्ष कोरानाच्या निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यांदा आल्या होत्या. मात्र या वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी दिनांक 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळामध्ये मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सर्वाजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गाडयांना टोलमाफ करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या शासन निर्णयात हे नमूद करण्यात आले आहे. यासाठी टोलमाफी स्टिकर आणि पास आवश्यक आहेत.

हे सुद्धा वाचा

Festival: महाराष्ट्रात बैलांबरोबरच गाढवांचा पोळा देखील साजरा करतात

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

मागच्या मह‍िन्यात राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बैठकीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह इतर सुविधा देण्यात येणार आहेत अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार आज सार्वजन‍िक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा निर्णय जाह‍िर केला आहे. टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2022’ अशा आशयाचे स्टीकर्स लावणे गरजेचे आहे.

या पासवर वाहनांचा क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, प्रादेश‍िक परिवहन विभाग यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत. या शासकीय विभागांनी एकमेकांशी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या तसेच आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये हे पास उपलब्ध करुन दयावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत. ज्यांना कोकणात जाण्यासाठी पास हवेत ते परतीच्या प्रवासामध्ये देखील ग्राहय धरले जाणार आहेत. सरकारच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी