30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown4.0 : गृह राज्यमंत्री शंभुराजेंच्या जिल्ह्यातच भाजपकडून लॉकडाऊनची ऐशीतैशी, मंत्री महोदय चिडीचूप

Lockdown4.0 : गृह राज्यमंत्री शंभुराजेंच्या जिल्ह्यातच भाजपकडून लॉकडाऊनची ऐशीतैशी, मंत्री महोदय चिडीचूप

टीम लय भारी

सातारा : सामान्य व्यक्ती घराबाहेर पडली तर पोलीस त्याला चोपून काढतात. पण खासदार व आमदार हजारभर लोक गोळा करतात. बॅनर लावतात. फोटो सेशन करतात. मदत वाटपाचा जाहीर इव्हेन्ट करतात. लॉकडाऊनची ( Lockdown4.0 ) पुरती ऐशीतैशी करतात. पण जिल्ह्याचे महसूल व पोलीस प्रशासन मात्र या ओंगळवाण्या प्रकारावर कोणतीच कारवाई करीत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Lockdown4.0
मदत वाटप करताना सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैसी केल्याचे दिसत आहे

धक्कादायक म्हणजे, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई याच जिल्ह्यातील आहेत. तरीही गृहराज्य मंत्र्यांनी ही घटना गांभिर्याने घेतलेली दिसत नाही. शिवसेनेच्या शंभूराजेंनी भाजपच्या खासदार, आमदारांवर मेहेरबानी दाखविल्याचेही या निमित्ताने पुढे आले आहे.

Lockdown4.0
जाहिरात

खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी लॉकडाऊन ( Lockdown4.0 ) धाब्यावर बसविला होता. ‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown4.0 ) समस्याग्रस्त झालेल्या लोकांना मदत वाटपाचा कार्यक्रम या दुकलीने आयोजित केला होता. साताऱ्यातील (माण) दहिवडी या ठिकाणी हा जंगी सोहळा आयोजित केला होता.

मदत करायची असेल तर संबंधितांच्या घरी पोचविण्याची पद्धत देशभरातील दानशूर व्यक्ती अनुसूरत आहेत. पण निंबाळकर – गोरे यांनी चक्क सोहळा आयोजित केला. त्यासाठी भलामोठा बॅनरही लावला. हजारभर लोकांना या सोहळ्यात निमंत्रित करण्यात आले होते.

माण – खटाव मतदारसंघात ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पण तरीही लॉकडाऊनचे ( Lockdown4.0 ) सगळे नियम धाब्यावर बसवून हा कार्यक्रम घेण्यात आला.

Lockdown4.0
लोकांना मदत वाटप करताना कसलेही सोशल डिस्टन्शिंग पाळले नाही

राज्यात सर्वत्र कलम 144 लागू ( Lockdown4.0 )आहे. पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र आल्यास संचारबंदीचे उल्लंघन होते. खासदार – आमदारांनी तर हजारभर लोकांना एकत्र आणले होते. पण त्यांच्यावर काहीच कारवाई का केली गेली नाही.

Lockdown4.0
मदतीसाठी गरजू लोकांना असे ताटकळत उभे ठेवले होते. त्यात सोशल डिस्टन्शिंगचेही पालन झाले नाही

विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या तीन दिवस अगोदर आमदार जयकुमार गोरे हे पाच पेक्षा जास्त लोकांना जमा करून विहीरीत पोहत होते. त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरही महसूल व पोलीस खात्याने कसलीही कारवाई केलेली नाही.

Lockdown4.0
गरजवंतांना मदत देताना अशा वाईट पद्धतीने बसवून सोहळा साजरा केला

राजकीयदृष्ट्या बलदंड असलेल्या लोकांसमोर मान तुकवायची, अन् सामान्य लोकांवर सरकारी बडगा उगारायचा ( Lockdown4.0 ) असे धोरण सातारा प्रशासनाने अवलंबिले आहे की काय असाही सवाल उपस्थित झाला आहे.

याबाबत, शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, दहिवडी पोलिसांकडून मी माहिती घेतो असे त्यांनी सांगितले. साताऱ्याच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी मात्र फोन उचलला नाही.

हे सुद्धा वाचा

BJP MP MLA : सोशल डिस्टन्शिंगची ऐशीतैसी, भाजप खासदार – आमदाराने शेकडो लोकांना जमा करून मदत वाटपाचा सोहळा केला

BJP MLA : भाजपचा आमदार लोकांसोबत पोहण्यात दंग, सोशल डिस्टन्शिंगच्या तिनतेरा

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे ठरले, म्हणून अजितदादांनी बंड केले

MLA Rohit Pawar : डोळ्यात पाणीच येणार, चिमुकलीने आमदार रोहित पवारांशी साधलेला संवाद नक्की ऐका

Governor : शरद पवारांच्या नाराजीनंतरही राज्यपालांनी केली मुख्यमंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी

अजितदादांनी भाजपला फटकारले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी