30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeसंपादकीयमहात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग...

महात्मा गांधी यांच्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली होती (भाग -२ )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वच ओळखतो. मात्र त्यांना ही संधी देण्यात महात्मा गांधींचे योगदान आहे, हे फार कमीच लोकांना माहीत आहे. घटना समिती किंवा संविधान सभा याबद्दल आपले विचार मांडताना ती सर्व समावेशक असावी, त्यात सर्व पक्षांचे, विचारांचे प्रतिनिधी असावेत, असा आदेश गांधींनी दिला होता... वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वच ओळखतो. मात्र त्यांना ही संधी देण्यात महात्मा गांधींचे योगदान आहे, हे फार कमीच लोकांना माहीत आहे. घटना समिती किंवा संविधान सभा याबद्दल आपले विचार मांडताना ती सर्व समावेशक असावी, त्यात सर्व पक्षांचे, विचारांचे प्रतिनिधी असावेत, असा आदेश गांधींनी दिला होता. प्रांतिक (राज्य) विधिमंडळातून सध्या जसे प्रतिनिधी राज्य विधानसभेवर निवडून पाठवले जातात तसे तेव्हाच्या राज्य विधिमंडळामधून घटना समितीवर प्रतिनिधी पाठवायचे ठरले. १९४५ मध्ये झालेल्या अखंड भारतातील प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत एकूण १५८५ जागांपैकी ९२५ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. घटना समितीच्या एकूण जागांची संख्या ३८९ निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी २९६ प्रतिनिधी राज्य विधिमंडळांनी निवडून द्यावयाचे होते तर ९३ जागा संस्थानी प्रजेच्या प्रतिनिधींसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

जुलै १९४६ मध्ये झालेल्या घटना समितीच्या निवडणुकीत २१२ सर्वसाधारण जागांपैकी २०३ जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यानुसार काँग्रेसशी संबंधित नसलेले बुद्धिवंत, विचारवंत, कायदेपंडित एवढेच नव्हे तर काँग्रेसचे विरोधक असलेले नेतेही काँग्रेसने घटना समितीवर निवडून पाठवले होते. काँग्रेसचे विरोधक असलेल्या जस्टीस पार्टीचे श्वेतचलपतिराव व हिंदू महासभेचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेतेसुद्धा काँग्रेसने पाठिंबा देऊन घटना समितीवर पाठवले होते. तत्कालीन ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’चे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र असे सहकार्य काँग्रेसकडून पहिल्यांदा लाभले नाही. तत्कालीन मुंबई (आजची महाराष्ट्र) विधानसभेतून घटना समितीवर निवडून येण्याइतपत संख्याबळ नसल्याने आंबेडकरांना बंगाल राज्याच्या विधिमंडळातून घटना समितीत प्रवेश मिळवावा लागला. मात्र फाळणी झाल्यानंतर त्यांचे भारतीय घटना समितीतील सदस्यत्व संपुष्टात आले. मात्र या काळात त्यांनी घटना समितीचे सदस्य म्हणून केलेले कार्य, त्यांची भाषणे यामुळे काँग्रेस आणि त्यांच्यातील दुरावा कमी झाला होता. स्वतः महात्मा गांधींनाही आंबेडकर आणि आपल्या विचारात अनेक विषयांवर समानता असल्याचे जाणवले. गांधी वा काँग्रेस आणि आंबेडकर यांचे कार्य परस्परपूरक असल्याचे आणि देशाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर तीव्र स्वरूपाचे कोणतेही मतभेद त्यांच्यात नसल्याचे या तीनही घटकांना तोपर्यंत पटले होते.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी यांनी देशातील पहिली राज्यघटना लिहिली होती (वरिष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार यांचा विशेष लेख)

महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यात आपण भांडणे लावतो – भाग २ (राजदीप सरदेसाई यांचा विशेष लेख)

शरद पवारांनी सांगितले, गांधी – नेहरू यांचे महात्म्य

महात्मा गांधीच्या विरोधात खरंच ब्राह्मण समाज आहे का? (प्रफुल्ल फडके यांचा विशेष लेख – भाग १)

काँग्रेस म्हणजे जळते घर आहे, अशी जळजळीत टीका करणारे बाबासाहेबही काँग्रेस पक्षाशी जुळवून घेण्याच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधींनी डॉ. आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीत घटना समितीवर पुन्हा निवडून पाठविण्याच्या सूचना नेहरू आणि वल्लभभाई पटेलांना दिल्या. मात्र घटना समितीत जागाच नसल्याने त्यांना घटना समितीवर पाठवायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच काही विषयांवर तीव्र मतभेद झाल्याने मुंबई विधिमंडळातून घटना समितीवर सदस्य म्हणून गेलेले मुकुंदराव जयकर यांनी राजीनामा दिला (काही जाणकारांचे मत आहे की त्यांना गांधींच्या सूचनेवरून राजीनामा देण्यास सांगण्यात आले, कारण त्यांच्या विविध विषयांवरील मतांवर गांधी तीव्र नाराज होते.). गांधींच्या सक्त आदेशानंतर काँग्रेस पक्ष कामाला लागला. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ३० जून १९४७ तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी १ जुलै १९४७ रोजी मुंबई प्रातांचे तत्कालीन पंतप्रधान (त्या काळात मुख्यमंत्र्यांनाही पंतप्रधान म्हणत) बाळ गंगाधर खेर यांना पत्र पाठवून डॉ. आंबेडकर हे कोणत्याही परिस्थितीत तेही शक्यतो बिनविरोध निवडून यायला हवे, अशा सूचना दिल्या. त्यामुळे १४ जुलै १९४७ रोजी बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांतातून बिनविरोध घटना समितीवर निवडले गेले. एवढेच नव्हे तर बहुमतात असलेल्या काँग्रेसने त्यांना घटनेच्या मसुदा समितीवर निवडून त्यांना या समितीच्या अध्यक्षपदाचाही सार्थ बहुमान प्रदान केला. आंबेडकरांचे दीर्घ काळ स्वीय सचिव राहिलेले नानकचंद रत्तू यांनीसुद्धा आंबेडकरांच्या अखेरच्या वर्षातील आठवणींवर आधारित एका पुस्तकात महात्मा गांधींमुळेच बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून जाता आले, याची कृतज्ञ नोंद नमूद केली आहे (क्रमशः)

‘गांधी – नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का ?’ या नावाने ‘लय भारी’ने नुकताच एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. या अंकात राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारीता इत्यादी क्षेत्रातील ४५ पेक्षा जास्त नामवंत मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. यांत शरद पवार, राजदीप सरदेसाई, भाऊ तोरसेकर, श्रीराम पवार, यशवंतराव गडाख, तुषार गांधी, राजू परूळेकर, प्रा. एन. जी. राजूरकर, कुमार सप्तर्षी, अशोक चौसाळकर, संजय आवटे, श्रीमंत माने, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर, माधव भांडारी, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार, सत्यजित तांबे, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, प्रसाद काथे, बंधुराज लोणे, प्रमोद चुंचूवार, रफिक मुल्ला, प्रफुल्ल फडके, राजन वेळूकर, नाना पटोले, उल्हास पवार, , विश्वास काश्यप, राज कुलकर्णी, राजेश खरात आदींचा समावेश आहे. या अंकातील निवडक लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. हा विशेषांक खरेदी करण्यासाठी संपादक श्री. तुषार खरात यांच्याशी ९८२१२८८६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी