32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयआरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

आरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

राज्यात सरकार बदलताच काही नवीन घटना घडताना दिसत असून काही घडलेल्या घटनांना उजाळा मिळत आहे. राज्यात उद्धव ठाकरे सरकार होते, तेव्हा ललित पाटील प्रकरणाबाबत नामोनिशाण नव्हता. मात्र आता सरकार बदलले आणि लगेच काही घडलेली प्रकरणं बाहेर येऊ लागली आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण हे काही दिवसांपासून शांत होते. या प्रकरणाचा अभ्यास केल्यास, तो कोठे होता? पुण्यातील रूग्णालयात त्याला कोणी आणि कोठे ठेवले होते?. तो किती दिवस होता? याबाबतची माहीती समोर आली आहे. याच प्रकरणाची पुनरावृत्ती उद्योगपती आणि घोटाळेबाज अविनाश भोसलेंच्या बाबतीत दिसत आहे. कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या उद्योगपतीला जेजे आणि सेंट जॉर्ज रूग्णालयात राजेशाही सुविधा मिळत असल्याचे समोर आले आहे. याची दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अविनाश भोसलेंवरील व्हीआयपी उपचारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

डीएचएफएल आणि येस बॅंक घोटाळ्यात उद्योगपती अविनाश भोसले यांना मनीलॉंड्रिंग घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. मात्र आता हे घोटाळेबाज उद्योगपती अविनाश भोसले तुरूंगाऐवजी आता पंचतारांकीत रुग्णालयात राजेशाही जीवन जगत आहेत. २०२२ मध्ये भोसलेंना ईडीने अटक केली होती. आर्थररोड येथील जेलमध्ये त्यांना दाखल करण्याबाबतचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांची कोरोनाकाळात तब्येत बिघडल्याने त्यांना सुरूवातीला जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जेजेच्या अधीक्षक पल्लवी सापळे यांनी त्यांना राजेशाही सोईसुविधा दिल्याचा आरोप होत आहे. तर सेंट जॉर्ज या रुग्णालयात त्यांना काही महिन्यांपूर्वी दाखल केले. या ठिकाणी त्यांना पोलिस यंत्रणा, वातानुकूलित वॉर्ड तसेच इतर सुविधा केवळ ७०० रूपयात देण्यात आल्या.

अविनाश भोसले हे उद्योगपती आहेत. मात्र भोसले डीएचएफएल आणि येस बॅंक घोटाळ्यात सापडल्याने त्यांना ईडीने सनद पाठवले होते. मात्र अविनाश भोसलेंना कोरोना आजार झाल्याची काही चिन्हे होती. आर्थररोड जेल येथील अनेक कैद्यांना आजारी असल्यास जेजे रूग्णालयात दाखल केले जाते. यामुळे अविनाश भोसलेंना जेजे रूग्णालयात जानेवारी ते ऑगस्ट या ७ महिन्यांपर्यत उपचार सुरु होते.  यावेळी जेजेच्या डीन पल्लवी सापळे हे जातीने लक्ष घालत होत्या. यानंतर आता ऑगस्टपासून सेंट जॉर्ज रूग्णालयात ३ महिने झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे एकूण १० महिने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा 

शिर्डीच्या सभेत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर कडाडले

मुंबई सिनेट निवडणूक घोटाळ्यावर शिक्कामोर्तब, आशीष शेलारांचा दावा.. पण चौकशीतून आले सत्य समोर!

डॉक्टर नरेंद्र जाधव ‘भीमभाष्य’मधून मांडतात बाबासाहेबांची गाथा

७०० रूपयांत व्हीआयपी सुविधा

ईडीचे समन्स आल्यापासून आरोप्यांच्या वॉर्डमध्ये भोसले कधीच गेले नाहीत. आजारी आरोप्यांसाठी जेजे रूग्णालयात तिसऱ्या वॉर्डजवळ स्वतंत्र बेड दाखल केले आहेत. या ठिकाणी भोसले हे नव्हतेच, तर त्यांना वॉर्ड क्रमांक ९ जवळ एसी वॉर्ड राजेशाही सोईसुविधा देण्यात येत असून सामान्य नागरिकांना रूग्णालयात ३ ते ४ हजार रूपये खर्च होतो. मात्र एक उद्योगपती आणि घोटाळेबाज अविनाश भोसलेंना केवळ ७०० रूपयांत व्हीआयपी सुविधा मिळत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी