29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयशिवसेनेतील बंडखोरी ही मराठी माणसांना संपवण्यासाठी ; भाजपचे मोठे कपट कारस्थान

शिवसेनेतील बंडखोरी ही मराठी माणसांना संपवण्यासाठी ; भाजपचे मोठे कपट कारस्थान

 

टीम लय भारी

मुंबई : राज्यात सध्या ‘न भुतो न भविष्यती‘ अशी उलथापालथ सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांची रणधूमाळी शिगेला पोहोचली आहे. जनतेचं डोकं या घटनांमुळे चक्रावून गेले आहे. आता पुढे काय याची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली आहे. शिवसेना म्हणजे मराठी बाणा, शिवसेना नेहमीच मराठी माणसासाठी लढत आली आहे. बाळा साहेबांनी मराठी माणसासाठी लढा दिला. त्यामुळे मराठी माणसांच्या मनात शिवसेनेला अढळ स्थान प्राप्त झाले. याच मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का पोहोचवण्याचे काम शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी केले आहे. मराठी माणसाला संपवायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे.अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेच्या गटातून गनिमी काव्याने सुटून आलेले आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.

‘मावळयांनो परत या‘ असे आव्हान सुटका करुन आलेले आमदार नितीन देशमुख यांनी बंडखोर शिवसैनिकांना केले आहे. कट कारस्थान करण्यापेक्षा राजीनामा दयायला हवा होता. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी मुंबई ते सुरत प्रवासाचा थरारक अनुभव पत्रकार परिषदेत सांगितला. कैलास पाटील यांनी कशीबशी सुटका करुन ते मुंबईला परतले.मात्र नितीन देशमुख हे मृत्यूच्या दाढेतून सुटून आले. नितीन देशमुख यांना पहिल्यांदा गटनेते पदी असलेल्या एकनाथ शिंदेनी बंगल्यावर बोलावले.

त्यांना पालघरला नेले. आमदार वनगा यांच्याकडे जात असल्याचा बनाव केला. नंतर त्यांनी आपली गाडी सुरतच्या दिशेने वळवली. त्यांना या ठिकाणी शंभूराज, भूमरे, सत्तार आदी आमदार या ठिकाणी हजर होते. गुजरातला गेल्यावर हाॅटेल बाहेर 350 गुजरात पोलिसांचा खडा पहारा होता. गुजरात पोलीस हे भाजपचे गुलाम असल्या सारखे वागत होते. त्यामध्ये आयपीएस आधिकारी होते.

नितीन देशमुख एकनाथ शिंदेना सांगून निघाले. त्यावेळी सुमारे 150 पोलिसांनी रात्री 12.30 ते 3 वाजेदरम्यान त्यांचा पाठलाग केला. त्यांना जबरदस्तीने हाॅस्पिटलमध्य नेले.
कोणताही आजार नसतांना संबंधित हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी त्यांना हार्टची समस्या असल्याचे सांगून गुंगीचे इंजेक्शन दिले. त्यावेळी आपण मृत्यूच्या दाढेत असून आपला घातपात होत असल्याची खात्री त्यांना झाली. तिथून त्यांनी पलायन केले. या पत्रकार परिषदेतून बंडखोर आमदार तसेच भाजपची कपटती जनतेसमोर आली आहे.

हे सुद्धा वाचा : ‘वर्षां‘नी दार उघडले; आता ‘बडव्यांचे‘ काय?

शिवसेना ‘महाविकास आघाडी’तून बाहेर पडण्यास तयार, पण बंडखोर आमदारांनी मुंबईत यावे : संजय राऊत

आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतात, अन् तिथून गुवाहाटीला जातात हे आश्चर्यकारक : अनिल गोटे

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी