31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रखळबळजनक : आमदार नितीन देशमुखांना जबरदस्तीने रूग्णालयात कोंबले, सक्तीने इंजेक्शन दिले

खळबळजनक : आमदार नितीन देशमुखांना जबरदस्तीने रूग्णालयात कोंबले, सक्तीने इंजेक्शन दिले

टीम लय भारी

मुंबई : पळपुटे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना फसवून महाराष्ट्राबाहेर नेले आहे. एवढेच नव्हे तर, आमदार नितीन देशमुख यांना जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना सक्तीने इंजेक्शन देण्यात आले. नितीन देशमुख हे सुरतमधून निसटून नागपूरमध्ये परतले आहेत. विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी मीडियाला आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कारस्थानांची माहिती दिली.

माझी तब्येत व्यवस्थित आहे. मला कोणताही अटॅक आलेला नव्हता. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे, असे नितीन देशमुख म्हणाले. मी हॉटेलमधून निसटून बाहेर पडलो होतो. मला महाराष्ट्रात परत यायचे होते. पण कोणतेही वाहन मिळेना. वाहनात मला बसू दिले जात नव्हते. गुजरातचे १००-२०० पोलीस माझ्यामागे लागले. त्यांनी जबरदस्तीने मला रूग्णालयात कोंबले, अशी खळबळजनक माहिती नितीन देशमुख यांनी दिली.

मला कोणताही आजार नसताना मला रुग्णालयात चुकीचे इंजेक्शन देण्यात आली. जबरदस्तीने इंजेक्शन देण्यात आले. माझ्या शरीरावर नको ती प्रक्रिया करण्यात आल्याचे ते म्हणाले.

उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनाही एकनाथ शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण ते शिंदे यांच्या तावडीतून सुटून परत आले होते. त्यानंतर नितीन देशमुखांचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेले किती आमदार स्वेच्छेने त्यांच्याबरोबर गेले आहेत, या विषयी संशय निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदेंसह पळपुट्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी केली प्रतारणा

‘आमचे आमदार आमच्यासोबत’

सेनेच्या नव्या गटनेत्याला बंडखोर आमदारांचा विरोध

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी