28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत दोन दिवसात मुलं बेपत्ता; ६ मुलं शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश

नवी मुंबईत दोन दिवसात मुलं बेपत्ता; ६ मुलं शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश

नवी मुंबई हे शहर विकासाच्या सानिध्यात आहे. काही वर्षातच या शहराचा विकास हा झपाट्याने वाढत गेला आहे. हे शहर मुंबईला जोडलं गेलं आहे. मात्र या शहरात असुरक्षितता निर्माण होत आहे. एनसीआरबी (NCRB) च्या अहवालानुसार नवी मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरासाठी नकारात्मक बाब असून आता यात आणखी एक भर पडली आहे, गेल्या दोन दिवसात नवी मुंबईत ६ मुलं बेपत्ता झाली आहेत. यामुळे आता नवी मुंबईतील पालकांनी आपल्या पाल्यावर (बालकांवर) लक्ष ठेवावं आणि सतर्क राहवं. या शहरात गुन्हेगारीसह लहान मुलांचे अपहरण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र अशातच काही मुलांचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला यश आले आहे.

नवी मुंबईतील ‘या’ भागातील मुलं बेपत्ता

नवी मुंबईतील ६ मुलं बेपत्ता झाली असून ती कळंबोली, पनवेल, कामोठे, कोपरखैरणे, रबाळे या भागातून बेपत्ता झाली आहेत. ही मुलं १२ ते १५ वयोगटातील असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बेपत्ता झालेल्या मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात मुलांच्या बेपत्ता होण्याबाबत तक्रार नोंदवली आहे. यावेळी पोलीस प्रशासन जागं झालं आहे. पोलिसांनी काही मुलांचा शोध देखील घेतला आहे.

हे ही वाचा

‘शिंदे-फडणवीस सरकार अ-संविधानिक’

सोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

टीम इंडियाचा रवी बिश्नोई गोलंदाजीत एक नंबर; राशिद खानलाही टाकलं मागे

बेपत्ता मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी बेपत्ता झालेल्या मुलांना शोधण्यास सुरुवात केली असून एक टास्क फोर्सची स्थापना केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांच्या मदतीने मुलांना शोधण्याचं काम सुरू आहे. त्यापैकी रबाळे, कोपरखैरणे, कामोठे परिसरातील काही मुलं सापडली आहेत, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.

बेपत्ता मुलांपैकी काही मुलं शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश

नवी मुंबईतील बेपत्ता झालेल्या मुलांपैकी काही मुलं सापडली आहेत. कोपरखैरणे पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेला १२ वर्षीय मुलगा प्रज्वल पाटील हा ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सापडला आहे. रबाळे पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता झालेली १३ वर्षीय अनुष्का राजभर ही मुलगी ऐरोलीत सापडली. कमोठे कॉलनीतून गायब झालेली अंतरा विचारे ही मुलगी गुजरात येथे सापडली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी