28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'जितेंद्र आव्हाड राजकारणातले राखी सावंत'

‘जितेंद्र आव्हाड राजकारणातले राखी सावंत’

राज्यात अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये खडजंगी पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि टीका टाप्पणी सुरू आहे. अजित पवारांनी आव्हाडांच्या फिजिकल फिटनेसवरून टीका केली होती, तर आव्हाडांनी देखील अजित पवारांचे पोट बाहेर आलेला फोटो ट्विट केला आहे, यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड म्हणजे राजकारणातील राखी सावंत अशी टीका केली आहे.

आव्हडांवर टीका

सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांवर राजकारणातील राखी सावंत अशी टीका केली होती. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जितेंद्र आव्हाड अजित पवारांवर टीका करत आहेत, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या अशा काही गोष्टी आमच्याकडे आहेत, दादा मला माफ करा.. असं म्हणायची वेळ त्यांच्यावर येईल, असे सूरज चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, सुरूवातील काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली. यानंतर आव्हाडांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांचा पावसात भिजलेला फोटो शेअर करत हाच का सिक्सपॅक अॅब्स असे कॅप्शन देत आव्हाडांवर टीका केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी रोहित पवारांनाही धारेवर धरलं आहे. 

हे ही वाचा

नवी मुंबईत दोन दिवसात मुलं बेपत्ता; ६ मुलं शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश

‘शिंदे-फडणवीस सरकार अ-संविधानिक’

सोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर टीका

राज्यात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. यावर देखील सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवार काही दिवसांपासून युवा संघर्ष यात्रा करत आहेत. याची सुरूवात ही पुण्यातून झाली आहे. यावर चव्हाण म्हणाले की, ही संघर्ष यात्रा नाही तर पीकनीक आहे. या यात्रेवर संपूर्ण जनता टीका करत आहे. यांच्या राशीत कधीच संघर्ष नव्हता आणि संघर्ष करायला लागले आहेत. यावेळी टीका करताना राहुल गांधीची भारत जोडो यात्रा आणि युवा संघर्ष यात्रा तसाच प्रकार राज्यात सुरू असल्याचं सूरज चव्हाण म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी