33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचा रवी बिश्नोई गोलंदाजीत एक नंबर; राशिद खानलाही टाकलं मागे

टीम इंडियाचा रवी बिश्नोई गोलंदाजीत एक नंबर; राशिद खानलाही टाकलं मागे

देशात काही दिवसांआधी इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा टी 20 मालिका सामना झाला आहे. या मालिकेत टीम इंडियाने ४-१ ने टी 20 मालिकेत विजय मिळवला आहे. विश्वचषकात टीम इंडियाने चांगला खेळ दाखवला असला तरीही अंतिम सामन्यात इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून इंडियाच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाची पळता भुई थोडी केली आहे.  यामध्ये रवी बिश्नोईने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू गोलंदाज राशिद खानला मागे सोडलं असून स्वत: गोलंदाजीसाठी अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.

टी 20 सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा फिरकीपटू गोलंदाज राशिद खान गोलंदाज म्हणून अव्वल स्थानावर होता. आता त्याची जागा टीम इंडियाचा गोलंदाज रवी बिश्नोईनं घेतली आहे. राशिद खानच्या गोलंदाजीच्या गुणांचा विचार केल्यास  ६९२ रेटींग असून रवी बिश्नोईचं ६९९ रेटींग आहे. रवी बिश्नोईने आगेकूच केली आहे. बिश्नोई आधी पाचव्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाच्या टी 20 मालिकेनंतर महेश तिक्षाना, आदिल रशीद, वानिंदू हसरंगा आणि राशिद खानला मागे सोडत अव्वल स्थान पटकावले. यावेळी या मालिकेत त्याने पाच सामन्यात ९ गडी बाद करत, प्लेअर ऑप द सिरीज म्हणून निवडण्यात आलं आहे. तर आगामी द.आफ्रिकेच्या मालिकेसाठी रवी बिश्नेईला संधी मिळाली आहे.

 

हे ही वाचा

‘महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणार नाहीत’

सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत फिरतोय? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांच्यात ढेरीवरून कोपरखळ्या

टी 20 इंडिया-ऑस्ट्रेलिया मालिकेत इंडियाने आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवने चांगली फलंदाजी करत आपले स्थान अबाधित ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या ५ सामन्यात सूर्याने २८.८० च्या सरासरीने १४४ धावा केल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी