27 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

सोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने सोलापूरमध्ये यंदा आखील भारतीय नाट्यसंमेलनातर्फे १०० वे नाट्यसंमेलन पार पडणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा स्विकार करावा असा नाट्यसंमेलनातील अनेक सदस्यांचे मत आहे. या मताचा मान राखत चंद्रकांत पाटील यांनी २७ आणि २८ जानेवारीत होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद म्हणून धुरा सांभाळण्यास होकार दिला आहे. राजकीय क्षेत्राप्रमाणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाट्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना पाठिंबा देत आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी २ लाख ५१ हजारांची देणगी दिली आहे.

सोमवारी या नाट्यसंमेलनाबाबत सूर्या हॉटेलला सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करावे असे अनेकांचं मत होतं. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी स्वागताध्यक्षपद स्विकारणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी १०० वे नाट्यासंमेलन होणार असून नाट्यसंमेलनाला मदतीचा हात दिला आहे. नाट्यसंमेलनास आवश्यक निधी आणि अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही. जुळे सोलापूर परिसरात अनेक दिवसांपासून नाट्यगृह व्हावे अशी आपेक्षा नाट्यरसिकांची आहे. ही आपेक्षा येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, यासाठी मी स्वत: कामाचा पाठपुरवठा करेल,असे आश्वासन आता चंद्रकंत पाटील यांनी दिलं आहे.

हे ही वाचा

टीम इंडियाचा रवी बिश्नोई गोलंदाजीत एक नंबर; राशिद खानलाही टाकलं मागे

‘महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणार नाहीत’

सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत फिरतोय? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

चंद्रकांत पाटील यांच्याकडून २ लाख ५१ रूपयांची हजारांची देणगी

चंद्रकांत पाटील यांनी नाट्यसंमेलमनासाठी स्वत:च्या पगारातून २ लाख ५१ हजारांची देणगी दिली आहे. यानंतर राजेंद्र राऊत आणि उद्योजक दत्ता सुरवसे यांनी प्रत्येकी एक-एक लाख रुपये देणगी नाट्य संमेलनासाठी दिली आहे. २० ते २६ जानेवारीत सोलापूरमध्ये १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर २७ आणि २८ जानेवारी दिवशी मुख्य नाट्यसंमेलन सादर करण्यात येणार आहे.

नाट्यसंमेलनाच्या झालेल्या बैठकीत नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राजेंद्र राऊत, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, विश्वनाथ आव्हाड, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी