32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे संविधान लिहायला सुरूवात केली असेल' !

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे संविधान लिहायला सुरूवात केली असेल’ !

(मंगेश फदाले) : देशभरात (६ डिसेंबर) दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दादर येथे चैत्यभूमीवर राज्यातून अनेक लोकं घटना शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी काही राजकीय नेत्यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. याचवरून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अ-संविधानिक सरकार म्हणत सरकारवर टीका केली आहे. काल झालेल्या महापरिनिर्वाण दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी या तिघांना एकत्र बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं संविधान लिहायला सुरूवात केली असेल, अशी मिश्कील टीका लयभारी माध्यमाशी बोलताना केली.

 काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

महापरिनिर्वाण दिनानिमित्त जितेंद्र आव्हाडांनी लय भारी माध्यमाशी संवाद साधत असताना सत्ताधारी पक्षांवर सडकून टीका केली आहे, ते म्हणाले की, अजित पवार,एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं संविधान लिहायला घेतलं असेल. हे सरकार असंविधानिक असून ट्रिपल इंजिन सरकार बेकायदेशीर असल्याची टीका आव्हाडांनी केली आहे.

याच विषयाला हात घालत सत्ताधारी पक्षाकडून आब राखली जात आहे का? खरोखर संविधान रक्षण केलं जात आहे का? असे देखील प्रश्न विचारले आहेत. याच प्रश्नावर राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी उत्तरले, ट्रीपल इंजिनला एकत्र, या तिघांना सुबुद्धी मिळो, असा विचार बाबासाहेबांनी केला असेल, असे सिद्दीकी म्हणाले आहेत. यावेळी राज्यातून आणि देशातून अनेकांनी बाबसाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केलं आहे. मात्र काही लोकं संविधान मानत नाहीत. याबाबत आता राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा

सोलापूर येथील १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

टीम इंडियाचा रवी बिश्नोई गोलंदाजीत एक नंबर; राशिद खानलाही टाकलं मागे

‘महाराष्ट्रात मराठा शिल्लक राहणार नाहीत’

जी लोकं संविधानाचा मान राखतात. संविधानाचा आदर राखतात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील मानतात. मात्र जे लोकं संविधानाला मानत नाहीत. संविधानाचे पालन करत नसून संविधानाला पायमल्ली करतात. आदर करत नाहीत ती मंडळी चैत्यभूमीवर जाऊच शकत नाहीत. काही नेत्यांना मतांसाठी चैत्यभूमीवर जाऊन फोटो सेशन करावे लागते, अशा संविधान विरोधक मंडळींना पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या समोर खरंच नतमस्तक व्हायला आलात की, फोटो काढण्यासाठी एकत्र आलात? असा प्रश्न उपस्थित केला असता, असे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लयभारी सोबत बोलताना सांगितलं आहे.

काही नेत्यांचं मौन

कॉंग्रेस नेते मिलिंद देवरा यांना चैत्यभूमीवर आलेल्या ट्रीपल इंजिन सरकारच्या फोटोसेशनबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर एकही शब्द काढला नाही. तर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी नेते आशोक बापू पवार हे निरूत्तर होते. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत, सचिन अहिर यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता उत्तर देण्यासाठी प्रतिसाद दिला नाही.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी