28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रप्रभाकर साहिलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता ;सीआयडी चौकशी करा

प्रभाकर साहिलच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता ;सीआयडी चौकशी करा

टीम लय भारी 

मुंबई:  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर या प्रकरणात  पंच प्रभाकर साईल  या अनेक दावे केले होते. मात्र प्रभाकर यांचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राज्यसरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. NCP demand prabhakar sahil’s death; cid inquiry

कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा फर्जीवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देशासमोर आणला होता. एनसीबीचा तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे कशा फर्जी कारवाई करतो हे पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेत सिद्ध केले होते त्यामुळे केंद्रीय एजन्सी असलेल्या एनसीबीची देशभर नाचक्की झाली होती. NCP demand prabhakar sahil’s death; cid inquiry

असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.  इतर सहा जणांना नवाब मलिक यांनी समोर आणत त्यांचं भाजप कनेक्शन कसं आहे याचे पुरावे माध्यमांना पत्रकार परिषदेत देत एनसीबीची पोलखोल केली होती. NCP demand prabhakar sahil’s death; cid inquiry

फर्जी अधिकारी के. पी. गोसावी याचा बॉडीगार्ड आणि ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साहिल याने नवाब मलिक यांनी फर्जीवाडा समोर आणल्यानंतर ही कारवाई कशी फर्जी होते हे समोर आणले होते. मात्र आज त्याचा अचानक हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे.

आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने ६० दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू होतो यामागे नक्कीच काहीतरी दडलं आहे त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले आहे. NCP demand prabhakar sahil’s death; cid inquiry

हे सुध्दा वाचा :

https://indiagroundreport.com/mr/mumbai-cid-probe-into-prabhakar-sahils-death-mahesh/

भाजपच्या मंत्र्याचे अनोखे स्वागत, हवेत झाडल्या गोळ्या

सार्वजनिक हिताच्या कुठल्याच कामाला पवारसाहेबांना कंटाळा येत नाही हे कदाचित सदाभाऊ खोतांना माहित नसावे

महिलेवर अन्याय, पोलिसांकडून टोलवाटोलवी

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी