26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसंसदेत झालेल्या हल्ल्याचा संदर्भ थेट कल्याणपर्यंत

संसदेत झालेल्या हल्ल्याचा संदर्भ थेट कल्याणपर्यंत

काही दिवसांपूर्वी देशाच्या संसदेत (Parliament) दोन तरूणांनी गॅलरीतून थेट सभागृहात हल्ला केला. सभागृहातील काही वेळ कामकाज थांबले गेले. देशभरात या प्रकरणावर चर्चा सुरू असून संसदेच्या संरक्षणावर मुद्दा उपस्थित केला जात आहे. तर यावेळी काही तरुणांनी रंगीत धुरांच्या नळकांड्या (Smoke Bomb) फोडल्या होत्या. आता या नळकांड्या दुसऱ्या तिसऱ्या नाही तर राज्याच्या कल्याण शहरातून विकत घेतल्या असल्याच्या चर्चा आहेत. गुप्तचर यंत्रणेने याबाबत शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. स्थानिक पोलिसांशी संवाद साधला असता, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आणि या प्रकरणातून पळ काढला. यामुळे आता कल्याण शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

नुकत्याच विविध शहरांमध्ये दिवाळी सणानिमित्त शहरांच्या अनेक भागात स्टॉल लावण्यास परवानगी दिली गेली. दिवाळीमध्ये शासनाने कमी आवाजाचे फटाके वाजवावेत असे सांगितलं होतं. यामुळे कमी आवाजाचे फटाके आणि हवेत धुराच्या फटाक्यांना अधिकाधिक मागणी असल्याने त्या फटाक्यांची विक्री केली जात होती. मात्र स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या फटक्यांची कोणतीही नोंद फटाके विक्रेते करून ठेवत नाहीत. यामुळे आता तरुणांनी धुरांच्या नळकांड्यांचे फटाके कल्याणमधून कोणत्या स्टॉलवरून घेतले आहेत. हे शोधणं गुप्तचर यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.

हे ही वाचा

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर हार्दिक पांड्याचा शिक्कामोर्तब

श्रेयसची प्रकृती स्थिर; पत्नी दिप्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरे उत्तरल्या

रंगीत नळकांड्या कल्याणमधून विक्री

संसदेत घुसखोरी केलेल्या तरुणांपैकी एका तरुणाने कल्याणमधून धुराच्या नळकांड्या असलेले फटाके विकत घेतले. यामुळे आता कल्याण शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीमुळे चर्चेत आले आहे. आता संसदेत झालेल्या प्रकरणामुळे कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा बदनाम झालं आहे. कल्याण पूर्व भागात अनेक तडीपार गुन्हेगार राहत असल्याचा दावा आता राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच (NRI) ने केला आहे. यामुळे त्यांचा तपास आता सुरू आहे.

हल्ला केल्याचं कारण काय?

संसदेत झालेल्या हल्ल्याने संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. संसदेत देशातील दोन तरुणांनी थेट सभागृहावर हल्ला केला. त्यांनी असं का केलं असावं? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्याचं कारण आता समोर आलं आहे. देशातील तरुण बेरोजगार आहेत. रोजगार मिळावा आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ त्यांनी संसदेवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी