28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजुळ्या बहिणींचा दादला बनलेल्या टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जुळ्या बहिणींचा दादला बनलेल्या टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईतील जुळ्या बहिणींचा दादला बनलेल्या टॅक्सी चालकाविरुद्ध अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन स्त्रियांशी लग्न केल्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला असला तरी दोघा इंजिनियर बहिणींनी मात्र एकाच पुरुषाशी लग्न केल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. सोलापूर पोलिसांनी याबाबत अदखलपात्र (एनसी) तक्रार दाखल केली आहे.

अंधेरीतील अतुल उत्तम अवताडे (मूळ राहणार सोलापूर) या टॅक्सी चालकाने चारकोप, कांदिवली पश्चिम येथील जुळ्या बहिणींशी विवाह केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानुसार, एकाचवेळी दोन महिलांशी लग्न लावल्याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी मुंबईतील टॅक्सी चालक अतुल अवताडे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अंतर्गत एनसी नोंदवण्यात आल्याचे सोलापूरचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी “लय भारी”ला सांगितले. पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा एकाहून अधिक लग्न करणे, हा कलम 494 नुसार अपराध आहे. या कलमानुसार, दुसरे लग्न करण्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तीला तुरुंगवास तसेच दंडही होऊ शकतो. अर्थात हा अदखलपात्र गुन्हा असल्याने पोलिसांना चौकशी सुरू करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याप्रकरणी चारकोप पोलिसांनीही तपास सुरू केला.

अतुल अवताडे याने 2 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरात एका हॉटेलमध्ये दोघा जुळ्या बहिणींशी लग्न केले होते. या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राहुल भरत फुले यांनी पतीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली होती. फुले यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या कृतीतून समाजात चुकीचा संदेश पसरत असून सामाजिक संकेत व कायदा धाब्यावर बसविला जात असल्याचे आक्षेप घेतले गेले होते.

हेही वाचा :

दोन जुळ्या बहिनींचा एकाच मुलाशी विवाह, आगळ्या-वेगळ्या नात्याची सर्वत्र चर्चा

Twins with Two Father : काय सांगता? जन्मलेल्या जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे

कांदिवलीत राहणाऱ्या रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी इंजिनियर आहेत. त्या आईसोबत राहतात. आई आजारी असताना तिला अंधेरीतील रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी अतुल अवताडेने या बहिणींना मदत केली होती. त्यातून एक बहिण त्याच्या प्रेमात पडली. दुसर्‍या बहिणीलाही अवताडे आवडू लागला. दोघींनी एकाचवेळी त्याच्याशी लग्न करण्याबाबत आईशी चर्चा केली. तिने दोन्ही बहिणींनी त्याच्याशी लग्न करण्यास परवानगी दिली, असे सांगितले जाते.

Police Complaint Against Taxi Driver

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी