29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रअहिल्यादेवी होळकर यांचा खोटा कळवळा आणणारे पडळकर गप्प का, प्रशांत विरकर यांचा...

अहिल्यादेवी होळकर यांचा खोटा कळवळा आणणारे पडळकर गप्प का, प्रशांत विरकर यांचा सवाल

महाराष्ट्र सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सदनमध्ये असलेले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला केल्याच्या कृतीचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. एरवी सत्ताधारी पक्षातील धनगर समाजाबद्दल खोटा कळवळा आणणारे गोपीचंद पडळकर या घटनेनंतर गप्प का असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत विरकर यांनी केला आहे.

प्रशांत विरकर म्हणाले, महाराष्ट्र सदन मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र सदनमध्ये असलेले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले व त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला. त्या ठिकाणी पुतळे असताना देखील कार्यक्रम करता आला असता परंतु जाणून बुजून या शिंदे फडणवीस भाजप सरकारने तेथील पुतळे हटवले हा महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान आहे. अशावेळी सत्ताधारी पक्षातील धनगर समाजाबद्दल खोटा कळवळा आणणारे काही लाळघोटे महाभाग कोणत्या बिळात लपून बसले आहेत. आदरणीय पवार साहेबांबद्दल व पवार कुटुंबीयांबद्दल सातत्याने गरळ ओकणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पदाच्या लालसेपोटी सन्मान गहाण ठेवून कोणत्या बिळात लपून बसले आहेत त्यांनी याबद्दल आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हान देखील त्यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

सावित्रीबाई फुलेंबद्दल विकृत लिखाण, छगन भुजबळ संतापले !

आंबा पिकतो, रस गळतो, भाजपचा प्रचार जोर धरतो…

उत्कंठा वाढली, दहावीचा निकाल कधी लागणार ?

चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त पवार घराण्याबद्दल बोलण्यापेक्षा दिल्लीत झालेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या अवमानाबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा किंवा महापुरुषांबद्दलचा खोटा कळवळा आणून पदाच्या लालसेपोटी चाटुगिरी करणे बंद करावे. धनगर समाजाने देखील इथून पुढे अशा स्वार्थी व समाजाची दिशाभूल करणाऱ्या महाभागांना धडा शिकवावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे प्रशांत विरकर यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी