27 C
Mumbai
Tuesday, February 13, 2024
Homeमहाराष्ट्रशिर्डीतील निर्मळ पिंपरीत दलित कुटुंबाला मारहाण

शिर्डीतील निर्मळ पिंपरीत दलित कुटुंबाला मारहाण

देशात अनेक वर्षांपासून दलितांवर अन्याय अत्याचार होत आहे. राज्यात तर अशा अनेक घटना सुरूच असून दलितांवर अन्याय अत्याचार झाल्यानंतरही पोलिस यंत्रणा त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था कानाडोळा करत आहे. खैरलांजी हात्याकांडला अनेक वर्षे होऊन गेली असावीत. मात्र अजूनही सत्तेवर बसलेल्या राजकीय नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. अशातच आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील निर्मळ पिंपरी येथे एका दलित कुटुंबाला मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर कुटुंबाने न्याय मिळवून देण्याबाबत सरकारकडे मागणी केली असल्याची माहिती ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीने दिली.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघातील निर्मळ पिंपरी गाव आहे. या गावातील दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार करून त्यांना मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्रामसभा भरवत गावाने दलित कुटुंबियांवर बहिष्कार टाकला आहे. यावर माध्यमांशी बोलत असताना पीडित कुटुंबातील महिला सुजाता गायकवाड यांनी झालेल्या प्रकारबाबत माहिती दिली आहे. सुजाता गायकवाड यांनी सरकारने लवकरात लवकर न्याय द्यावा आणि कडक शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा

‘जितेंद्र आव्हाड राजकारणातले राखी सावंत’

नवी मुंबईत दोन दिवसात मुलं बेपत्ता; ६ मुलं शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश

‘शिंदे-फडणवीस सरकार अ-संविधानिक’

घरातले पाच ते सहा पोती धान्य अस्थाव्यस्थ पाडले गेले आहे. गाड्या चेपवल्या असून मागील बाजूस शेड होतं त्या शेडला देखील काडी लावली आहे. बकऱ्यांवर देखील हल्ला केला असून बकरी खाली पडली, असे सुजाता यांनी सांगितलं आहे. यानंतर पत्रकारांनी आपली आपेक्षा काय? असा प्रश्न विचारला असता, न्याय मिळावा आणि त्यांनी शिक्षा व्हावी, अशी आपेक्षा पीडित महिलेनं माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

यानंतर दलित कुटुंबातील विलास कोळगे यांनी माध्यमांशी बोलताना हळहळ व्यक्त केली आहे. मला एक अपंग भाऊ असून त्याला एकच पाय आहे. एक सव्वा महिन्याची मुलगी आणि एक वर्षांची मुलगी आहे. जातीवाद करणाऱ्यांना सरकारने कठोर शिक्षा करावी नाहीतर आम्ही उपोषण करू,असे विलास कोळगे म्हणाले आहेत. दलित कुटुंबाला घरात गावातील काही लोकांनी कोंंडून ठेवून मारहाण केली आहे. यावेळी लहान मुलांना आणि मुलींना लाथा बुक्यांनी मारण्यात आले आहे, अशी माहिती आता रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी