28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयनवाब मलिक कोणत्या गटात?

नवाब मलिक कोणत्या गटात?

राज्यात मध्यंतरी राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटात अधिक आमदार हे अजित पवार गटात आहेत. नूकतंच हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे अशातच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मोठ्या कालावधीतून हिवाळी अधिवेशनाला आले होते. काही काळ नवाब मलिक अजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते, यामुळे आता मलिक हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक कोणत्या पक्षात जाणार? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर मलिक अजित पवार गटातील नेत्यांच्या बाकडावर जाऊन बसले. त्याआधी ते राष्ट्रवादी प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन बसले होते, यामुळे आता नवाब मलिक हे राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

अजित पवारांना नवाब मलिकांबाबत माध्यमांनी विचारले असता, माध्यमांशी संवाद साधत म्हणाले की सभागृहात कोणाला कुठं जायचं आहे याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष ठरवतील. त्यामुळे मधल्या काळात काय घटना घडल्या याबाबत तुम्हाला माहिती आहे.  त्यांचा आज फोन आला. यावेळी मी त्यांचे स्वागत केलं, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा

शिर्डीतील निर्मळ पिंपरीत दलित कुटुंबाला मारहाण

नवी मुंबईत दोन दिवसात मुलं बेपत्ता; ६ मुलं शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश

‘जितेंद्र आव्हाड राजकारणातले राखी सावंत’

अंबादास दानवेंचा नवाब मलिकांवरून फडणवीसांसोबत कलगीतुरा

राज्यात आगामी निवडणुका लक्षात घेता आरोप-प्रत्यारोप अनेकदा होत आहेत. नवाब मलिकांवरून आता विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच वाद झाला आहे. अंबादास दानवेंनी फडणवीसांना देशद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, असे सत्ताधारी म्हणाले होते. अशी टीका केली होती, त्यानंतर दाऊद इब्राहिमसोबत आर्थिक व्यवहार आहेत, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करा असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. यावर आता फडणवीसांनीही दानवेंना मलिक जेलमध्ये असताना मंत्रीपद का काढून घेतलं नाही, असा सवाल केला आहे.

आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. त्यांच्या बाजूला अजित पवार मांडीला मांडी लावून बसले आहेत, तर त्यांच्या बाजूला छगन भुजबळ बसले असल्याचं फडणवीसांनी मिश्किल प्रत्युत्तर दिलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी