27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंचं पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं - फडणवीस

राज ठाकरेंचं पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं – फडणवीस

टीम लय भारी

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी 1 जूलैला राज ठाकरेंच्या पत्राचा त्यानी उल्लेख केला. राज ठाकरेंचं ते पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं असे फडणवीस म्हणाले. मी तुमच्या इतकं सुंदर लिहू शकत नाही. तुमच्या पत्राला उत्तर देणार नाही. तुमचे आॅपरेशन झाले आहे. मी तुम्हाला भेटायला येईल. त्यावेळी आपण चर्चा करु.

राज ठाकरेंनी 1 जूलैला फडणवीसांना अभिनंदनाचे पत्र लिहले होते. त्यात त्यांनी आपला मित्र असा उल्लेख केला आहे. ‘शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र‘ या न्यायाने फडणवीस आणि राज ठाकरेंची मैत्री असू शकते, असा संशय सामान्य जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. भाजप आणि मनसे युती होणार नाही. हे खरे असले तरी व्यक्तीगतपणे उध्दव ठाकरेंना हरवण्यासाठी राज ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा होऊ शकते. त्यांची मैत्री वाढू शकते. भविष्यात राज ठाकरेंच्या महितीचा देवेंद्र फडणवीस निश्चितपणे चांगला उपयोग करुन घेतील यात शंकाच नाही.

राज ठाकरेंचं पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं - फडणवीस

या पत्रात राज ठाकरेंनी म्हटले आहे की, ‘ही बढती की अवनती हयात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावी लागते. या ओढलेल्या दोरीला कोणी माघारी म्हणत नाही!  तुम्हाला यापुढे मोठा राजकीय प्रवास करायचा आहे‘. राज ठाकरेंनी एक पायरी खाली उतरलेल्या फडणवीसांचे सांत्वन केले आहे. त्यांना धिर दिला आहे. धनुष्याची दोरी म्हणेच ‘प्रत्यंचया‘ मागे खेचली तरच लक्षावर अचूक बाण लागतो. तसे भविष्यात घडू शकेल. पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणे हे गोष्ट फडणवीसांसाठी भूषणावह आहे. त्यांच्या मनाचा मोठे पणा दाखवणारी आहे.पक्षाशी असलेली बांधिलकी यातून दिसून येते.सगळयाच पक्षांच्या कार्यकत्र्यांना बोध घेण्यासारखा आहे.

यापूर्वी आपल्या अनेक भाषणांमध्ये राज ठाकरेंनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊतचा खरपूस समाचार घेतला आहे. अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगींच्या धोरणांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. त्यांच्या हनुमान चालीसाला भाजपने उदंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मनसे आणि भाजपची आता चांगली मैत्री जुळली आहे. हे राज्यातल्या जनतेला आता कळून चुकले आहे
.
हे सुध्दा वाचा:

ही एक ‘सस्पेन्स‘ फिल्म आहे -उपमुख्यमंत्री

सिडकोच्या नियोजनावर फिरले पाणी; पालिकांचे दावे ठरले फोल

रस्त्यावर धावणारी ‘जलपरी’ तुम्ही पाहिली का?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी