30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रराजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार

राजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार

विनोद मोहिते : टीम लय भारी

इस्लामपूर :  आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या आरोग्य सेवेकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागणार आहे, हे कोविडच्या महामारीने हे सिद्ध झाले आहे. त्या अनुषंगानेच राज्यातील आरोग्यसेवा आंतरराष्ट्रीय अन् कार्पोरेट दर्जाची कारवी लागेल, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले ( Rajesh Tope said, international health service will be provide ).

येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या मदतीने आठ कोटी रुपये खर्चून अद्यावत कोविड रूग्णालय उभारण्यात आले आहे. या रूग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते ( Tata trust provide 8 corer to Covid center in Islampur ) .

जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यावेळी अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंग नाईक, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राजेश टोपे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • यापुढे सॅनिटायझर, एन 95 मास्क किंव्हा कोणतेही प्रकारचे मास्क एका ठराविक किमतीतच विकावे लागेल. या बाबत ४ दिवसात निर्णय घेतला जाईल.
  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील १ हजार हॉस्पिटलमध्ये जनतेला मिळणार कॅश लेस सेवा
  • आरोग्य विभागात १७ हजार जागा मेरिटने भरणार
  • कोरोना काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांना देखील ५० लाखांचे विमा कवच.
  • राज्यातील मृत्यू दर १ % खाली आणण्यासाठी प्रयत्न.
  • सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा दर १७% आहे. तो कमी करायचा आहे.
  • इस्लामपूरच्या रुग्णालयात बेस्ट डॉक्टर्स दिले जातील. सरकार पाहिजे ती मदत करेल. खासगी डॉक्टर्सनीही योगदान द्यावे

राजेश टोपे पुढे म्हणाले की, येत्या काही दिवसांत आरोग्य विभागात गुणवत्तेनुसार १७ हजार कर्मचाऱ्यांची भरती होईल. संकटाचा सामना करण्यासाठी शासकीय रुग्णालयात सर्व यंत्रणा अद्ययावत व प्रशिक्षित मनुष्यबळाची असेल ( Rajesh Tope said, 17000 manpower will be recruit by Mahavikas Aghadi government ).

कोरोना काळात सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांना देखील ५० लाखांचे विमा कवच मिळेल. त्यामुळे आयएमएच्या डॉक्टरांनी मनामध्ये भीती न बाळगता सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, अगोदर अजित पवारांना फटकारले, आता पार्थला; म्हणजे काहीतरी गौडबंगाल आहे

शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कोरोना’, १२ रूग्ण सापडले

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

Jayant Patil : जयंत पाटील मुंबईवरून इस्लामपुरला परतले, अन् कार्यकर्ते भावनिक झाले

मंत्री जयंत पाटील यांचा विनम्रपणा, सामान्य लोकांच्या भेटीसाठी विधानभवनातून आले रस्त्यावर !

‘महाविकास आघाडी’ सरकार प्रामाणिकपणे लोकहिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लस येईपर्यंत आपणाला मास्क, सॅनिटायझरचा उपायोग करूनच कोरोनासोबत जगावे लागणार आहे. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरचे दर नियंत्रित करणार आहोत ( Rajesh Tope said, Mahavikas Aghadi government will control rates of masks and sanitizers ).

‘कोरोना’च्या महामारीत कुणाकडेही दुर्लक्ष होणार नाही. ट्रेसिंग आणि अलगीकरण महत्त्वाचे आहे. टेस्टिंग करण्यात कमी पडू नका. आपणाला मृत्युदर एक टक्क्यांच्या खाली आणायचा आहे. तपासणी वाढवून नियंत्रण आणणे शक्य आहे. मुंबई, मालेगावात त्याचा चांगला अनुभव आला आहे. कुणालाही लक्षण दिसले तर  हयगय करू नका. अंगावर काढू नका, ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा, असेही त्यांनी आवाहन केले.

टोपे पुढे म्हणाले की, इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला आहे. याबद्दल सरकार व आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही टाटा ट्रस्टचे आभार मानत आहोत. कारण या निधीव्यतिरिक्त पुणे, मुंबईत व्हेंटिलेटर, पीपीई कीट, रुग्णवाहिका, मास्क यासाठी टाटांनी मोठी मदत केली आहे. मराठवाडा भागातही जालना, अंबड परिसरात अशा सुविधेची मदत अपेक्षित आहे ( Rajesh Tope acknowledged tata trust’s help ).

जयंत पाटील आणि आमचे विश्वासाचे नाते आहे. त्यांनी या भागात चांगले नियंत्रण प्रस्थापित केले. आपणाला दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. या सेंटरसाठी त्यांनी बेस्ट डॉक्टर्स द्यावेत. सरकार लागेल ती मदत करेल. यापूर्वी आरोग्य विभाग दुर्लक्षित राहिला होता. परंतु आता त्यावरील खर्च वाढण्याला प्राधान्य राहील.

विकसित देशांत आरोग्य सुविधा महत्वाच्या असतात. ‘कोरोना’ने आपणाला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे शिकवले आहे. सरकार अत्यंत अद्ययावत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आग्रही आहे. लोकांना झळ पोहोचू नये, असे दूरगामी निर्णय घेतले जात आहेत. खासगी रुग्णालये ताब्यात घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणारे अधिकार, मोफत रुग्णवाहिका, पोलीस कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा हे महत्त्वाचे निर्णय घेतलेत.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, मार्चमध्ये कोव्हिडने धडकी भरवली होती. त्यावर इस्लामपूरकरांनी मात केली. सध्याच्या वाढत्या संख्येच्या धोक्यात सांगली जिल्हा प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. आरोग्य विभागाने त्यावेळेस इस्लामपूरची जी परिस्थिती होती, ती विचारात घेऊन पुढाकार घेतला आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने आठ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे टाटा कुटुंबियांचे ऋणी आहोत ( Jayant Patil given thanks to Tata Trust ).

राजेश टोपे हे आमच्या सरकारचा चेहरा आहेत. ते प्रत्येक ठिकाणी पोहचत आहेत आणि घरात दुःखद घटना घडूनही ते राज्याच्या सेवेत सक्रिय आहेत, अशा भावना मंत्री टोपे यांच्याविषयी व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले की, मार्चमध्ये इस्लामपुरात रुग्ण सापडले. त्यावर पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण मिळवता आले. गंभीर रुग्णांसाठी व्यवस्था नसल्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे अद्यावत सेंटर उभारले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर जलद कालावधीत उभारले आहे. आता डेडिकेटेड सुविधांचा लाभ होईल. उद्यापासून चांगल्या दर्जाची सेवा त्याठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.

टाटा ट्रस्टचे एन. श्रीनाथ म्हणाले, टाटा समूह मदत नव्हे तर आपले कर्तव्य करत आहे. राज्याच्या लोकांसाठी काहीतरी करतोय याचे समाधान आहे. आम्ही सरकारसोबत विविध कार्यात नेहमीच सोबत राहू. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी आभार मानले. तहसीलदार रवींद्र सबणीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे,  डॉ. राणोजी देशमुख, डॉ. साकेत पाटील, सभापती शुभांगी पाटील, देवराज पाटील, अरुण लाड, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी