26 C
Mumbai
Monday, February 19, 2024
Homeमहाराष्ट्रखारघरच्या कांबळे दाम्पत्यांना मिळाला रामलल्लाच्या पूजेचा मान

खारघरच्या कांबळे दाम्पत्यांना मिळाला रामलल्लाच्या पूजेचा मान

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता काहीच तास उरले आहेत. १९ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन देशाला झालं आहे. रामाच्या मूर्तीची चर्चा सध्या वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. असंख्य वर्षांपासून रखडलेलं देशवासीयांचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. यासाठी आता मंदिराच्या न्यास समितीने काही दिवसांपासून जोरदार तयारीस सुरूवात केली आहे. अशातच आता देशातून एकूण ११ दाम्पत्यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी म्हणजेच पूजेचा मान आहे. या ११ पैकी खारघरच्या कांबळे दाम्पत्यांना तो मान मिळाला आहे आणि ते खूपच खुश आहेत. याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

२२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून रामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी खारघर येथील कांबळे दाम्पत्यांना पूजेचा मान दिला आहे. रामाच्या पूजेवेळी कोणालाच गर्भगृहामध्ये जाण्याची परवानगी नसेल. मात्र कांबळे दाम्पत्याला गर्भगृहात प्रवेश करण्यापासून कोणीच रोखणार नाही. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. एकूण ११ दाम्पत्यांपैकी विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे यांना प्राणप्रतिष्ठेदिवशी पूजेचा मान मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ३ जानेवारी दिवशी त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आलं आहे. यामुळे सध्या ते खूपच खुश आहेत.

हे ही वाचा

‘आरक्षण मिळालं नाहीतर आई जिजाऊची शपथ सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील’

मुंबई पोलिसांची हजारो पदे रिक्त

‘छाताडात गोळ्या घातल्या तरीही मागे हटणार नाही’

२० जानेवारीला दाम्पत्य आयोध्येला रवाना होणार असल्याची चर्चा आहे. कांबळे हे आरएसएसचे स्वयंसेवक आहेत. त्यांना मिळालेल्या बहुमानामुळे त्यांचा आनंद गगणामध्ये न मावणारा आहे. खारघर येथील सेक्टर २१ येथे हावरे स्प्लेंडर याठिकाणचे राहिवाशी आहेत. यामुळे पनवेलकरांसाठी कांबळे दाम्पत्य गर्वाची बाब असणार आहे.

‘२२ जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा’

२२ जानेवारी दिवशी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देश आता सज्ज झाला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये देशवासीयांनी आपल्या दारापुढं म्हणजेच अंगणामध्ये दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी