26 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमहाराष्ट्रRepublic day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल; पाहा गुजरातच्या देशप्रेमीची...

Republic day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल; पाहा गुजरातच्या देशप्रेमीची कलाकृती

आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत आहे. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. संपूर्ण देश उत्साहात आहे. आज देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केले आहे. सर्च इंजिन गुगलने हे doodle बनवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घ्या गुगलच्या या खास डूडलबद्दल…(Republic day 2023: Google’s special doodle; See the unique artwork of the patriot of Gujarat)

आजच्या Google डूडलची ही कलाकृती हाताने कापलेल्या कागदापासून क्लिष्टपणे तयार केली गेली आहे. ही कलाकृती गुजरातमधील कलाकार पार्थ कोठेकर याची आहे. कलाकृतीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील अनेक घटक चित्रित केले आहेत. ज्यात त्यांनी राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, CRFP मार्चिंग दल आणि मोटरसायकल रायडर्स यांचा समावेश केला आहे. डूडलमध्ये ‘G’, ‘O’, ‘G’, ‘L’ आणि ‘E’ ही अक्षरे आहेत आणि राष्ट्रपती भवनाच्या घुमटावरील एक वर्तुळ ‘Google‘ मधील इतर ‘O’ चे प्रतिनिधित्व करते. मोनोक्रोममधील मोर आणि फुलांचे नमुने या कलेमध्ये भर घालतात.

हे सुद्धा वाचा : मोदींच्या नेतृत्वात, देशाच्या इतिहासात प्रथमच कट्टर मुस्लिम नेता प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणा!

SpiceJet offer: अरे व्वा! रेल्वे तिकीटाएवढ्या दरात करता येणार विमान प्रवास…

Google च्या जगभरातील १२,००० कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड

हे गुगल डूडल डिझाइन केल्यानंतर पार्थ कोठेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “भारताचे चित्र बनवणे ही माझी प्रेरणा होती,” असे कलाकार पार्थ सांगतात.

एक मुलाखतीत कलाकार पार्थ म्हणाला, ‘जेव्हा गुगलचा मेल आला तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले. मी Google चे ईमेल अनेक वेळा वाचले कारण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. यानंतर मी माझ्या आई आणि बहिणीला याची माहिती दिली. मला अशी संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. त्याचप्रमाणे ‘हे पेपर कट पूर्ण करण्यासाठी मला चार दिवस लागले. मी दिवसाला सहा तास काम करत होतो. मला भारताची जटिलता, त्याचे परस्परांशी जोडलेले पैलू दाखवायचे होते, जे प्रेक्षक कलाकृतीच्या गुंतागुंतीतून पाहू शकतील अशी मला आशा आहे, अशा भावना पार्थ यांनी व्यक्त केल्या.

पार्थने तयार केलेल्या या कलाकृतीचा मेकिंग व्हिडिओ गुगलने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी