33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रSupriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी...

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

टीम लय भारी

मुंबई :  घाटकोपरच्या रस्त्यावरच चिल्ल्या पिल्ल्यांसह नऊ सदस्य असलेले एक कुटुंब ताटकळत उभे होते. राजस्थान सरकारने त्यांना येथे आणून सोडले होते. त्यांना पुढे सोलापूरला जायचे होते. वाहनांची तर कसलीच सुविधा नव्हती. ग्रामीण भागातील अत्यंत साध्या व गरीब असलेल्या या कुटुंबाच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) धाऊन आल्या.

हे गरीब कुटुंब अडचणीत असलेले समजल्यानंतर सुप्रियाताईंनी ( Supriya Sule ) वेगवान चक्रे फिरवली. ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे’ व्यवस्थापकीय संचालक ( एमडी) शेखर चेन्ने यांच्यापर्यंत सुप्रियाताईंचा निरोप पोचला. अन्य राज्यांत जाणाऱ्या मजुरांसाठी महामंडळाकडून बस सोडल्या जातात. पण राज्याअंतर्गत बस सोडल्या जात नाहीत. त्यामुळे चन्ने यांच्यासमोर अडचण उभी राहिली.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

पण त्यावरही शेखर चन्ने यांनी उपाय शोधला. आंध्र प्रदेशला जाणाऱ्या एका बसमधून या नऊ जणांना त्यांनी सोलापूरला पाठवून दिले.

अनिल अवघडे हे आपल्या कुटुंबासह तीन महिन्यांपूर्वी राजस्थानला गेले होते. राजस्थानमध्ये त्यांची विवाहित मुलगी आहे. तिला भेटण्यासाठी सगळेजण तिकडे गेले होते.

दहा – पंधरा दिवस राहून ते परत येणार होते. पण ज्या दिवशी परत यायचे, त्याच दिवशी लॉकडाऊन घोषित झाला. त्यानंतर ते तिथेच अडकले. राजस्थान सरकारकडून तिथे अडकलेल्या लोकांना महाराष्ट्रात येण्यासाठी बस सोडल्या जात होत्या.

त्यानुसार तीन दिवसांपूर्वी अनिल अवघडे व त्यांच्या कुटुंबियांना राजस्थान सरकारने बसची सोय करून दिली. बसमध्ये अन्य लोकही होते. राजस्थान सरकारच्या या बसने अवघडे कुटुंबियांना घाटकोपर येथे आणून सोडले.

घाटकोपर येथे आल्यानंतर पुढे काय करायचे ते अवघडे कुटुंबियांना कळेचना. काही खासगी वाहन चालकांनी पुण्यापर्यंत नेतो असे सांगितले. परंतु त्यासाठी प्रती व्यक्ती 1000 रूपये शुल्क मागितले. अवघडे यांच्याकडे नऊ जणांचे नऊ हजार रुपये देण्यासाठी पैसे नव्हते.

या कुटुंबाबद्दल खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना माहिती मिळाली. सुप्रियाताईंनी ( Supriya Sule ) लगेचच त्यांचे स्वीय सहायक सुरेश पाटील यांना मदत करण्याची सुचना केली. सुप्रियाताईंच्या ( Supriya Sule ) सुचनेनुसार सुरेश पाटील यांनी शेखर चन्ने यांच्याशी चर्चा केली.

अवघडे कुटुंबिय मुंबईत साधारण पाच वाजता पोचले होते. सुप्रियाताईंच्या ( Supriya Sule ) निरोपानंतर चन्ने यांनी एसटी बस पाठविली. रात्री 10 वाजता अवघडे कुटुंब सोलापूरच्या दिशेने रवाना झाले.

‘सुप्रियाताई ( Supriya Sule ) बहिणीसारख्या मदतीला धाऊन आल्या. आमच्याकडे पैसे नव्हते. रस्त्यावरच आम्ही ताटकळलो होतो. अशा परिस्थितीत त्यांनी मदत केली, आणि एकही रुपयाचे तिकिट न आकारता एसटी महामंडळाने आम्हाला सोलापूरात सोडले’ अशी भावना अनिल अवघडे यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

Mahavikas Aghadi

सोलापुरात आल्यानंतर आम्ही येथील सरकारी डॉक्टरांना भेटलो. त्यांच्या सुचनेनुसार आम्ही 7 दिवसांसाठी घरात कोरन्टाईन झालो असल्याचे अवघडे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची माणूसकी, लॉकडाऊनमुळे ताटातूट झालेल्या माय लेकराची घालून दिली भेट

Anil Deshmukh : अनिल देशमुख रेल्वे मंत्र्यांवर संतापले, महाराष्ट्राची फजिती करण्याचा डाव आखल्याचा केला आरोप

Corona : ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाने पत्नीसोबत रूग्णालयातच केला लग्नाचा वाढदिवस साजरा, अनिल देशमुख – धनंजय मुंडेंनी केले कौतुक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी