29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ

टीम लय भारी

मुंबई: मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला (Uddhav Thackeray inaugurates BDD Chaal Redevelopment Project).

सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्त या दोघाही महापुरुषांना वंदन करतो. आजच्या दिवशी एका चांगल्या कार्याची सुरुवात होत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये लोकांना हक्काचे घर आहे की नाही, ही खंत कोणी व्यक्त करायची? आज आम्ही हे आव्हान स्वीकारले असून या स्वराज्यात स्वतःचं हक्काचं घर आम्ही देत आहोत. असे उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray said we are giving our rightful home in this Swarajya).

संजय राऊतांचा शिवसेना भवनावर बोलणाऱ्या प्रसाद लाड आणि नितेश राणेंवर हल्लाबोल

केरळनंतर आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला

36 महिन्याने आपण सगळ्या एकत्र चाव्या देऊ

आज या प्रकल्पाचे शुभारंभ आपण करत आहोत, तर 36 महिन्याने आपण सगळ्या एकत्र चाव्या देऊ. आयुष्य काही-काही क्षण अनपेक्षितपणे येत असतात. मुख्यमंत्रिपद स्वप्नात नव्हते. आता त्याच्या खोलात जात नाही, ते स्वीकारले. लहानपणापासून या परिसरात येणे आहे. शिवसेना प्रमुखांसोबत यायचो. भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईत, मराठी माणसाने रक्त सांडवले आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.(Uddhav Thackeray said that in 36 months we will all give the keys together).

Uddhav Thackeray inaugurates BDD Chaal Project
बीडीडी चाळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे शुभारंभ

मुख्यमंत्र्यांचा रहिवाशांना सल्ला मोहाला बळी पडू नका

माझे दोन्ही आजोळ हे चाळीतच राहिले, मी त्यांच्याकडे लहानपणापासून जायचो, त्यामुळे चाळीतले जीवन मला माहिती आहे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, स्वतःची हक्काची घरे झाल्यावर मोहाला बळी पडू नका” असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना दिला (Uddhav Thackeray advised the residents not to fall prey to temptation).

भाजप नेते बाबूल सुप्रीयो यांचा राजकारणाला रामराम

Mumbai: CM and Pawar to lay the foundation stone for redevelopment of BDD chawls today

शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा

बीडीडी चाळींचा एक मोठा इतिहास आहेे. या चाळीनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. वासुदेव बळवंत फडके यांसारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पू.ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णन केले.

Uddhav Thackeray inaugurates BDD Chaal Project
बीडीडी चाळ

या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगार वर्ग प्रामुख्याने राहू लागला. शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये तर अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार अशी अनेक प्रतिष्ठित महापुरुष वास्तव्यास होते. तसेच मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे (Uddhav Thackeray said that BDD is a chali with a hundred years of historical heritage).

कशी झाली बीडीडीची स्थापना?

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून शासनाने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी  बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली (Established BDD and prepared housing scheme in Mumbai city).

वरळी येथील जांबोरी मैदान येथे आयोजित बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कार्यक्रमाला, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील,  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल डोंगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी