32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद पाणी प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं

औरंगाबाद पाणी प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं

टीम लय भारी

मुंबई: ऐन उन्हाळ्यात औरंगाबाद शहारातील पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारण तीन ते चार दिवसाने शहरात पाणीपुरवठा होत आहे. या भीषण पाणीटंचाईने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. Uddhav Thackeray meeting Aurangabad water issue

“मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झालाच पाहिजे” अश्या सूचना मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून  मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळून द्यावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीला औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थितीत होते.

हे सुद्धा वाचा: 

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम ३ जून रोजी गोपीनाथ गडावर होणार

CM Yogi Adityanath watches Akshay Kumar-starrer ‘Samrat Prithviraj’ at a special screening, movie declared tax free in UP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी