32 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रराजाराम जाधव कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्काराने सन्मानित

राजाराम जाधव कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्काराने सन्मानित

आत्मचरित्रपर वाड्मयीन प्रकारातील अजिंक्यवीरला सन २०२१-२२ या वर्षीचा कोकण मराठी साहित्य परिषदेचा अतिशय मानाचा स्मृती पुरस्कार सोहळा पार पडला आहे. डॉ. धनंजय कीर स्मृती पुरस्कार सोहळा झाला असून यवतमाळ येथील राजाराम जाधव यांच्या आत्मचरित्र्यापर पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार सोहळा हा रायगड जिल्ह्याच्या पचाड येथे आयोजित होणार आहे. यामुळे सध्या राजाराम जाधव यांचं यवतमाळमध्ये कौतुक होताना दिसत आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. राजाराम जाधव आता चर्चेत आले आहेत.

मधु मंगेश कर्णिक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याच हस्ते राजाराम जाधव यांना मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. जाधव हे यवतमाळच्या लालखेड या गावातील रहिवाशी आहेत. शासनाच्या सहसचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक विचारांना आणि त्यांच्या आचारांना मिळालेली पोचपावती आहे. गोरबंजारा सामाजातिल ते एक प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी आहेत.

हे ही वाचा

स्विगीच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ होण्याची शक्यता

‘इंडिया इज इंदीरा अॅंड इंदीरा इज इंडिया’, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा कंगना रान्नौतनं व्हिडीओ केला शेअर

‘ढाल बनून बापमाणसं उभी राहतात’

राजाराम जाधव यांचे साहित्य

लेखक आणि कवी राजाराम जाधव याचं वादळवारा (काव्यसंग्रह) , वाळवंटातील संधी प्रकाश (ग्रामीण लघुकथासंग्रह) , अंधार यात्रेचं स्वप्न ( वडिलांचं चरित्र ), अजिंक्यवीर (आत्मकथन), चंद्रकला (कादंबरी), हुंदके सामाजिक वेदनेचे ( वैचारिक लेख संग्रह) या पुस्तकांचे लेखन हे राजाराम जाधव यांनी केलं आहे. पुस्तक हवं असल्यास याडी बुक डेपो श्रीरामपुर, पुसद येथे संपर्क साधाव.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी