29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमराठी माणसांना अभिजात मराठीची माहिती असणं गरजेची : सुभाष देसाई

मराठी माणसांना अभिजात मराठीची माहिती असणं गरजेची : सुभाष देसाई

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात आजही अनेक मराठी लोकांना मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे हे माहिती नाही आहे. यासाठी मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे. याची माहिती सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना सुभाष देसाई यांनी बैठकीत दिल्या (Try to reach out to the Marathi people, said Subhash Desai in the meeting).

आज विश्वकोष मंडळाने मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेतली. मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे. ही माहिती लोकांपर्यंत कशी पोहचवता येईल यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करतच आहे. याखेरीज मराठी भाषा मूळ स्वरुपात अभिजात कशी आहे. याची माहिती ग्रंथ किंवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी दिल्या अशी सूचना सुभाष देसाईंनी दिल्या आहेत (Subhash Desai has instructed to try to reach out to the general public through books or exhibitions).

आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी भुजबळ, वडेट्टीवारांचा खोटारडेपणा – राम शिंदे

अजित पवार, अनिल परब यांच्यावरही सीबीआयची कुऱ्हाड, भाजपने कंबर कसली

आज मंत्रालयात विश्वकोष मंडळ यांनी सुभाष देसाई यांची भेट घेतली आणि चर्चा केली. या चर्चेत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे तसेच विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर दीक्षित या सर्वांची उपस्थित होती.

मराठी माणसांना अभिजात मराठीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. परंतु ही अभिजात मराठी नेमकी कशी आहे, याची माहिती सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विविध माध्यमांतून सर्वसामान्यांना उपलब्ध झाली पाहिजे. महाराष्ट्री प्राकृत ते मराठी अशी उत्क्रांतीची साखळीची सर्वांना ओळख झाली पाहिजे. विविध माध्यमांद्वारे मराठी भाषेचे मूळ जनतेपर्यंत पोहचविले पाहिजे अशी सूचना सुभाष देसाई यांनी केली.

प्रकाश आंबेडकर मुस्लिम आरक्षणासाठी सरकार विरोधात मोर्चा काढणार

Maharashtra: Value of MOUs between state govt and industries will touch Rs 2 lakh crore mark soon, says state Industries Minister Subhash Desai

Marathi people said Subhash Desai in the meeting
सुभाष देसाई

दुर्गम बोली भाषेतील शब्द नव्या पिढीसाठी रुढ झाले पाहिजेत, यासाठी त्याचा वापर लेखन, पटकथा तसेच मालिकांमध्ये झाला पाहिजे, असेही सुभाष देसाई म्हणाले.

यावेळी दीक्षित यांनी विश्वकोष मंडळाची पुढील वाटचाल आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. विश्वकोषाचे काम ग्रामीण भागापर्यंत पोहचविले जाईल. ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर विशेष भर दिला जाईल. विश्वकोषातील माहिती नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली जाईल.

पारंपारिक पद्धत आणि आधुनिक माध्यमांद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पुरविण्यात येईल. येत्या काळात २१ कोषांप्रमाणे कुमारकोष काढण्याचा मानस असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. खंड अद्यायवतीकरण, तपशील तपासणे, आक्षेपार्ह बाबींमध्ये दुरूस्ती करण्याचा मानस असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी त्यांच्या निवडीबद्दल राज्य शासनाचे आभार मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी