35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयउद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दणका, IAS मिलिंद म्हैसकर यांची केली उचलबांगडी

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दणका, IAS मिलिंद म्हैसकर यांची केली उचलबांगडी

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मिलिंद म्हैसकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हाडातून उचलबांगडी केली आहे. त्या ऐवजी तुलनेने कमी महत्वाच्या वन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती केली आहे ( Uddhav Thackery transferred to Milind Mhaiskar ).

Mahavikas Aghadi

मिलिंद म्हैसकर यांच्या पत्नी मनिषा म्हैसकर यांचीही यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कमी महत्वाच्या पदावर बदली होती. म्हाडा हे अतिशय महत्वाचे प्राधिकरण आहे. या प्राधिकरणावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसकर यांची नियुक्ती केली होती. आता उद्धव ठाकरे यांनी त्यांची बदली केली आहे.

हे सुद्धा वाचा

माणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार

Breaking : राजेश टोपे आक्रमक, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे 9 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याप्रकरणी मागविला अहवाल

IAS प्रभाकर देशमुख यांना ‘कोरोना’ची लागण

बाळासाहेब थोरात सोलापूरसाठी उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकणार

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी – शिवसेना

मुख्यमंत्र्यांनी आज एकूण सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आश्विनी जोशी यांचीही बदली केली आहे. त्या सर्व शिक्षा अभियानच्या प्रकल्प संचालक होत्या. त्यांना आता वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदासाठी कार्यमुक्त केले आहे.

औरंगाबादचे विद्यमान जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बदली मुख्य सचिव संजयकुमार यांच्या कार्यालयात उपसचिवपदावर करण्यात आली आहे.

lay bhari

जलस्वराज्यचे प्रकल्प व्यवस्थापक ए. ए. गुल्हाने यांची बदली चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी रँकचे के. एच. बगाटे यांची बदली श्री. साईबाबा ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी