30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयमाणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार

माणच्या निष्काळजी प्रांताधिकारी, तहसिलदारांची उचलबांगडी होणार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ व्हायरसच्या काळातही अत्यंत बेफिकीर वर्तर्णूक, जनहिताच्या कामांकडे दुर्लक्ष, वाळूसंदर्भात होत असलेली संशयास्पद कामे यांमुळे माण – खटावच्या प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे व तहसिलदार बाई माने यांच्यावर गंभीर कारवाई होण्याची शक्यता आहे ( Mantralaya administration serious about Man Khatav ).

या दोन्ही अधिकाऱ्यांची उचलबांगडी जवळपास निश्चित झाली आहे. अशी कारवाई होऊ नये म्हणून भाजपचे एक आमदार प्रयत्नशिल आहेत. विशेषतः प्रांताधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी या भाजप आमदारांनी गेल्या काही दिवसांत आकाशपाताळ एक केले आहे.

‘प्रांताधिकाऱ्यांना वाचवा हो…’ अशा आर्त विनवण्या करणारे फोन या आमदाराने मंत्रालयात अनेक उच्चपदस्थांना केल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा

Breaking : राजेश टोपे आक्रमक, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे 9 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याप्रकरणी मागविला अहवाल

खळबळजनक :  साताऱ्यातील ‘त्या’ मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण, प्रशासनाच्या बेफिकीरीचा परिणाम

राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ

खळबळजनक : शरद पवार, राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच सातारा प्रशासनाकडून भयानक घोडचूक

मात्र, प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्याविरोधात गंभीर तक्रारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वाळू घोटाळे अन् जनहिताकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अगोदरच प्रांताधिकारी व तहसिलदारांबद्दल अनेक तक्रारी मंत्रालयात आल्या होत्या. अशातच आता ‘कोविड’ निर्मूलनातही या अधिकाऱ्यांनी अत्यंत बेफिकीरपणा दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे पांढरवाडीतील ९ कोरोना रूग्णांना निष्कारण संसर्ग झाल्याने सरकारची संपूर्ण महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणी त्यांच्या खात्यात साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. पण महसूल खात्याच्याही बेजबाबदारपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भूमिका आहे.

lay bhari

‘जे अडाणी माणसाला कळते, ते माणच्या प्रांताधिकारी व तहसिलदारांनाही कसे कळत नाही’ अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्रालयातील एका सनदी अधिकाऱ्याने ‘लय भारी’शी बोलताना खासगीमध्ये व्यक्त केली. अशा बेजबादार अधिकाऱ्यांना वाचविले तर सरकारचीही बदनामी होईल, अशीही भावना या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी