28 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरसिनेमासिद्धार्थ-कियाराच्या लग्नातही आहे 'ही' खास पॉलिसी; पाहुण्यांना पाळावे लागणार कडक नियम!

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातही आहे ‘ही’ खास पॉलिसी; पाहुण्यांना पाळावे लागणार कडक नियम!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. आज म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले असून ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. आज या जोडप्याचा मेहंदी सोहळा होणार आहे. त्याचप्रमाणे जैसलमेरमधील आलिशान सूर्यगढ पॅलेस हॉटेलमध्ये या जोडप्याचा विवाह सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या दोघांनी देखील आपल्या लग्नात सामील होणाऱ्या पाहुण्यांवर काही निर्बंध लावले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार इतर सेलिब्रिटींच्या लग्नाप्रमाणे यामध्येही नो-फोन पॉलिसी असणार आहे आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नाही, तर वधू-वरांनी पाहुण्यांना त्यांचे कोणतेही फोटो सध्या सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती केली आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नातील प्री-वेडिंग सोहळे ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहेत. तर, ६ फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मेहेंदी, हळद आणि संगीत या सगळ्या कार्यक्रमांसाठी दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

काल संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ मल्होत्रा विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी तो ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. त्याने मॅचिंग ट्रॅक पॅन्ट आणि पांढरे स्नीकर्स परिधान केले होते. जैसलमेर विमानतळावर त्याची आई रीमा मल्होत्रा, वडील सुनील मल्होत्रा आणि भाऊ यांच्यासह कुटुंबातील काही सदस्यही दिसले. तर, दुपारच्या दरम्यान कियारा अडवाणी पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये जैसलमेरला जाताना दिसली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा डिझायनर मित्र मनीष मल्होत्रा देखील दिसला. कियारा तिच्या लग्नात मनीषने डिझाइन केलेले कपडे घालणार असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा : सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

तुमचे लाडके जान्हवी-श्री परत येताहेत!

स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार विकी कौशल

सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती. कियारा आणि सिद्धार्थ गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सिद्धार्थने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 15 चित्रपट केले आहेत. कियाराने 22 चित्रपट केले आहेत. कियारा 30 कोटींची मालकीण तर सिद्धार्थची एकूण कमाई 75 कोटी आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी