30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमुंबईचिंता वाढली असली तरी मुंबई कोरोनाशी लढण्यास सज्ज : किशोरी पेडणेकर

चिंता वाढली असली तरी मुंबई कोरोनाशी लढण्यास सज्ज : किशोरी पेडणेकर

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत काल एका दिवसात रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार देला आहे. त्यामुळे चिंता वाढली असली तरी मुंबई करोनाशी लढण्यास सज्ज असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतली आणि करोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे(Mumbai ready to fight Corona: Kishori Pednekar).

मुंबईतल्या चिंताजनक करोना परिस्थितीसंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर आज माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने लावण्यात येणाऱ्या निर्बंधांबद्दल भाष्य केलं. मुंबईत विकेंड लॉकडाउन लागणार का? याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, “आज मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि इतर मंत्री तसंच शरद पवार यांच्याशी बोलून निश्चितच निर्णय होईल.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील थिएटर, मॉल्स बंद करणार का?

Maharashtra Corona, omicron : कोरोनाचा आकडा 26 हजारांच्या पार, तर ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण

एक मात्र स्पष्ट आहे की शनिवार रविवारी मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त वाढते. त्यामुळे राज्याला आणि मुंबईला जो धोका आहे, त्याची पातळी ओलांडताना दिसत आहे. अशातच मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे की ते हळूवार पावलांनी पण खंबीरपणे आपली भूमिका घेत आहेत. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय कळेल. रुग्णसंख्या वाढत असल्याने कदाचित निर्बंधांमध्ये वाढ होऊ शकते”.

महापौर पेडणेकर पुढे म्हणाल्या, “जर आत्ताच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही, तर धोक्याची पातळी ओलांडून गेल्यावर धावपळ होणार. ती वेळीच रोखावी, अशा पद्धतीने मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चाललेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला पक्की खात्री आहे.

महाराष्ट्रात कठोर निर्बंधांबाबत निर्णयाची शक्यता

Covid-19 3rd wave: Doctors in Delhi, Mumbai say most Corona cases mild, don’t need oxygen support

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घिसाडघाईने निर्णय घेणारे मुख्यमंत्री नाहीत आणि ते धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर जो विश्वास टाकला आणि पहिली, दुसरी लाट रोखली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी