26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरमुंबईआयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

टीम लय भारी

सातारा : कार्पोरेट कंपनीसारखी ग्रामपंचायत… इंटरनॅशनल स्कूललाही लाजवेल अशी मराठी माध्यमाची शाळा… गावगाड्यातील आखीव रेखीव रस्ते… गावात कस्पटही सापडणार नाही अशी स्वच्छता… आर्थिक भार लिलया पेलणारी सोसायटी, पतसंस्था अन् बँक… तलावाच्या किनाऱ्यावर फुललेला बगीचा… ओढ्या नाल्यांतून झुळझूळ वाहणारे पाणी… डोळ्यांना गुदगुल्या करणारे निसर्गसौंदर्य…. हे वर्णन कोणत्याही पर्यटन स्थळाचे नाही. पण पर्यटन स्थळालाही लाजवेल अशा दुष्काळी भागातील एका खेडेगावाचे आहे. जवळपास ३८ वर्षांच्या अथक मेहनतीने गावाने हे रुप धारण केले आहे. त्याचे शिल्पकार आहेत एक आयएएस अधिकारी. या आयएएस अधिकाऱ्याने केलेली कमाल पाहण्यासाठी ९५ अधिकारी गावात आले होते.

गावाचे नाव आहे निढळ. अन् त्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे चंद्रकांत दळवी. दळवी हे नुकतेच सनदी सेवेतून निवृत्त झाले. सरकारी सेवेत असतानाही त्यांनी आपल्या गावाकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी गावाचा कायापालट केला. एका सनदी अधिकाऱ्याने मनात आणले तर काय होऊ शकते हे पाहण्यासाठी ९५ नवनियुक्त अधिकाऱ्यांनी निढळला गुरूवारी भेट दिली.

 

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन
जाहिरात

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची परीक्षा यशस्वी करून हे ९५ अधिकारी प्रशासकीय सेवेत दाखल होऊ घातले आहेत. पुण्यातील यशदामध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणात ‘ग्रामविकास’ उपक्रमाअंतर्गत निढळ गावच्या अभ्यास दौऱ्याचा समावेश केला होता. त्यानुसार हे प्रशिक्षणार्थी अधिकारी निढळ भेटीवर आले होते. त्यात ३४ उप जिल्हाधिकारी, ३२ तहसिलदार व २९ नायब तहसिलदारांचा समावेश होता. या एकूण ९५ अधिकाऱ्यांमध्ये २० महिला होत्या.

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

दौऱ्याच्या सुरूवातीला प्रशिक्षणार्थ्यांनी शाळेला भेट दिली. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ३२ वर्षांपूर्वी बांधलेली शाळा, त्यासाठी एकत्र येऊन केलेले निधी संकलन, शाळेसाठी गावकऱ्यांनी दिलेल्या जमिनी असा शाळेचा ऐतिहासिक प्रवास त्यांनी समजून घेतला. त्यानंतर जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. यांत सीसीटी, डीप सीसीटी, सिमेंट साखळी बंधारे, माती नाला बांध, वृक्ष लागवड, गावकऱ्यांनी विकसित केलेली पीक पद्धत, ठिबक व तुषार सिंचन या बाबी त्यांनी समजावून घेतल्या. गावातील रस्ते, स्वच्छता, गावचे अर्थकारण, बाजार व्यवस्था, महिला बचत गट इत्यादी माहिती घेतली.

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

अभ्यास दौऱ्याच्या समारोपाप्रसंगी गावकऱ्यांसोबत संवाद आयोजित करण्यात आला होता. गावकऱ्यांची एकजूट, गावांतील विविध उपक्रम, कामे तडीस नेण्याची कला अशी माहिती त्यांना देण्यात आली. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून विकासाची कामे कशी करता येतात याचे मार्गदर्शन चंद्रकांत दळवी यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

आम्ही आता प्रशासकीय सेवेत आलो आहोत. दळवी यांच्याप्रमाणे आम्हीही असे कोणत्या तरी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करण्याचा प्रयत्न करू अशा भावनाही या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

मंत्री अशोक चव्हाणांच्या कार्यालयाची धुरा गिरीश महाजनांच्या ‘आदर्श’ सेनापतीकडे

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर ६० आयएएस अधिकारी

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!