36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबई'इडा पीडा टळो' सिध्दी विनायक चरणी प्रार्थना

‘इडा पीडा टळो’ सिध्दी विनायक चरणी प्रार्थना

टीम लय भारी

मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज ‘सिध्दी विनायक’ मंदिरात जाऊन पूजापाठ केले. यावेळी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटातील अनेक आमदार उपस्थित होते. शिवसेनेमध्येच राहिलेले आमदार आदेश बांदेकर देखील उपस्थित होते. ते सिध्दी विनायक प्रशासनामध्ये पदाधिकारी आहेत. प्रसाद लाड यांनी यावेळी पूजा केली. सदा सरवणकर देखील यावेळी उपस्थित होते.

शिंदे फडणवीस सरकार अत्यंत सावधगिरीने पावलं उचलत आहे. कारण अजून त्यांना बराचा पल्ला गाठायचा आहे. मुख्य म्हणजे मंत्री मंडळाचा विस्तार अजून बाकी आहे.अजून एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ मिळालेले नाही. न्यायालयीन ‘लढाई’ बाकी आहे. त्यामुळे सर्व ‘ईडा पिडा टाळो’… हीच प्रार्थना करण्यासाठी हे दोघे जण आज सिध्दी विनायक मंदिरात पोहोचले असण्याची लोकांमध्ये चर्चा सुरु आहे.

'इडा पीडा टळो' सिध्दी विनायक चरणी प्रार्थना

देवेंद्र-राज भेट

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज ‘सिध्दी विनायक’ मंदिरात पूजेसाठी हजर होते. पूजेला येण्यापूर्वी त्यांनी मनसेच्या राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या तब्बेतीची चैकशी केली. राज ठाकरेंच्या पत्नीनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले. तर राज ठाकरेंनी शाल श्रीफळ देवून त्यांना शुभेच्छा दिल्या.फडणवीस यांना राज ठाकरेंनी पत्र लिहीले होते. या पत्रामध्ये त्यांनी फडणवीसांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले होते. मी आपल्याला भेटायला येईन असे वचन दिले होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे ही भेट झाली. सुमारे दीड तास या दोघांची चर्चा झाली.

हे सुध्दा वाचा:

घटस्फोटाचे कारण बनले ‘मंगळसूत्र’, वाचा सविस्तर…

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी