टीम लय भारी
मुंबई : शुक्रवारी मुंबईत दादर येथे वसंतस्मृती, भाजप कार्यालयात राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान मुंबई प्रदेश आणि वॉर्ड प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रभारी सी. टी. रवी जी. यांच्या हस्ते शुभारंभ केला. (BJP leader C. T. Ravi inaugurated rashtriya swasthya swayamsevak abhiyan at dadar, mumbai)
मुंबई वैद्यकीय आघाडी डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहेमीच तत्पर असतात. त्यामुळेच स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान यशस्वी होईल असा विश्वास भाजप राष्ट्रीय महामंत्री आणि प्रदेश प्रभारी सी टी रवी यांनी दाखवला. त्याचबरोबर कामाचे कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण
रुग्णवाहिकेला भाडे आकारल्यास आंदोलन करणार : शेखर कासुर्डे
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई वैद्यकीय आघाडी, भाजपच्या संयोजिका डॉ. स्मिता काळे बंडगर यांनी अहवालासोबतच उपस्थितांची नावे सांगितली.
बोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींचे पंतप्रधान पद हुकले होते
Opposition parties uniting to protect their family politics: BJP’s CT Ravi
यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री . संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, मुख्य प्रतोद विधान सभा महाराष्ट्र राज्य आमदार आशिष शेलार , मुंबई सचिव प्रतिक कर्पे . वैदयकिय आघाडी मुंबई संयोजक डॉ. स्मिता काळे बंडगर, सहसंयोजक डॉ. राजकुमार त्रीपाठी, डॉ. विनयकुमार थाठी, समन्वयक डॉ आकाश भटजिरे , आय टी सेल संयोजक श्री कृणाल गोडा , संयोजक डॉ आर बी यादव उत्तर पश्चिम जिल्हा, डॉ सौरभ सांगोरे उत्तर जिल्हा, डॉ रविंद्र म्हसके उत्तर मध्य जिल्हा, सहसंयोजक स्वप्निल जगदाळे दक्षिण जिल्हा, व इतर सर्व जिल्हा ,मंडळ तसेच वार्ड स्वास्थ्य स्वयंसेवक पदाधिकारी उपस्थित होते.